शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या घरात शिजणार डाळ

By admin | Updated: August 14, 2016 00:09 IST

तुरीची डाळ महागल्याने गोरगरीब कुटुंबांच्या जेवणातून वरण हद्दपार झाले होते. १५० ते २०० रुपये किलोवर...

 जिल्ह्यातील नऊ गोदामात तूर डाळ : बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना मिळणार लाभ गौरव देशमुख वर्धा तुरीची डाळ महागल्याने गोरगरीब कुटुंबांच्या जेवणातून वरण हद्दपार झाले होते. १५० ते २०० रुपये किलोवर तूर डाळीचे भाव गेल्याने सामान्य नागरिकांना ते परवडेणासे झाले होते. तूर डाळीच्या भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. शिवाय गोरगरीबांना तूर डाळ घेता यावी म्हणून स्वस्त धान्य दुकानांमध्ये तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. चालू आॅगस्ट महिन्यापासून कंंट्रोलमध्ये तूर डाळ उपलब्ध करून दिली असून आता गरीबांच्या घरातही डाळ शिजणार आहे. तुरीची डाळ महागल्यााने गरीबांना वरण शिजविणे कठीण झाले होते. लहान मुलांना तर वरणाचे पाणी खाऊ घालण्यासाठीही विचार करावा लागत होता. याबाबत राज्यात सर्वत्र ओरड झाल्याने शासनाने हस्तक्षेप केला. तूर डाळ आणि तुरीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. साठेबाजांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आला. शिवाय अन्य उपाययोजनाही करण्यात आल्या. यामुळे खुल्या बाजारातील तूर डाळीचे भाव काही प्रमाणात नियंत्रणात आले. असे असले तरी हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना तूर डाळ खरेदी करणे शक्य नव्हते. गरीबांना स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार १०३ रुपये किलोप्रमाणे आॅगस्ट महिन्यापासून तूर डाळ मिळणार आहे. याचा लाभ ९१ हजार ८ बीपीएल व अंत्योदय कार्ड धारकांना मिळणार आहे. जिल्ह्यातील नऊ गोदामांत तूर डाळ पोहोचली आहे. ही डाळ ४७ हजार ७६९ बीपीएल व ४३ हजार २३९ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिधारक एक किलो याप्रमाणे वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. काळा बाजार होण्याची भीती स्वस्त धान्य दुकानदार माल आला नाही, माल कमी मिळाला, पुढच्या महिन्यात येईल, ट्रॅफिकमुळे माल रस्त्यातच आहे, अशी विविध कारणे लाभार्थ्यांना सांगतात. स्वस्त धान्य दुकानदार स्वस्त भावात धान्य देत असल्याने तो म्हणतो ते खरे समजणारेही अनेक आहेत. जे तक्रार करू शकतात, त्यांना मात्र दुकानदारामार्फत त्वरित धान्य पुरवठा केला जातो. यामुळे डाळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली की नाही, याची माहिती करून त्याची विक्री होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रती महिना एक किलो तूरडाळ मिळणार आहे.