शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या रोगाने पुलगाववासी त्रस्त

By admin | Updated: August 24, 2014 23:42 IST

महिनाभरापासून दिसेनासा झालेला पाऊस, ३६ अंशापर्यंत गेलेले तापमान व दिवसभर चालणारा कायमचा उकाडा यामुळे शहर व ग्रामीण भागात टायफाईट, गॅस्टो, डायरिया या साथीच्या रोगांचे

पुलगाव : महिनाभरापासून दिसेनासा झालेला पाऊस, ३६ अंशापर्यंत गेलेले तापमान व दिवसभर चालणारा कायमचा उकाडा यामुळे शहर व ग्रामीण भागात टायफाईट, गॅस्टो, डायरिया या साथीच्या रोगांचे आगमन झाले असून ताप सर्दी, खोकला या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. या सर्व परिस्थितीमुळे पुलगाववासी त्रस्त झाले आहे. संपूर्ण तालुक्यात संसर्गजन्य आजारांनी थैमान घाातले आहे़ या साथीच्या आजाराने तालुक्यातील नागरिक बेजार असून ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्य रूग्ण विभाग दररोज सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत हारूसफुल असतो. तर शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकाच्या दवाखान्यातही रूग्णांची गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यात पुलगाव भिडी देवळी येथे ग्रामीण रूग्णालये तर नाचणगाव, विजयगोपाल, गौळ, गिरोली, देवळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा आठ आरोग्य संस्था व प्रत्येक आरोग्य केंद्रांतर्गत येणारी उपकेंद्रे असा भलामोठा फौजफाटा रूग्णांच्या सेवेकरिता तैनात केला आहे. या सर्व रूग्णालयात सध्या संसर्गजन्य आजाराने ग्रासलेल्या रुग्णांव्यतिरिक्त इतरही रूग्णांची गर्दी वाढली आहे़ प्रत्येक आरोग्य केंद्रातील बाह्यरूग्ण विभागात दररोज १५०-२०० रूग्ण उपचारासाठी येत असून यापैकी बहुतांश रूग्ण थंडी, ताप, सर्दी, पडसा, खोकला या लक्षणांनी तर काही डायरिया, गॅस्ट्रो, टायफाईड व इतर साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. चिठ्ठीमुक्त योजनेचा प्रचार करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व शासकीय ग्रामीण रूग्णालयात बरेचदा जीवनरक्षक औषधाचा तुडवडा असतो़ त्यामुळे बऱ्याच रूग्णांना खाजगी व महागड्या औषधोपचार घावे लागतात. अधिकाऱ्यांच्या दोन-दोन जागा तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर असूनही काही आरोग्य केंद्रात केवळ एक तर काही केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेला एकच वैद्यकीय अधिकारी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतो़ प्रत्येक आरोग्य केंद्रात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. पण या कक्षासाठी तैनात करण्यात आलेला कर्मचारी वर्ग रात्रपाळीला उपस्थित राहत नसल्याची ओरड नागरिक करीत आहे़तालुक्यातील पुलगावसह इतर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह असंसर्गजन्य आजार नियंत्रण अधिकारी, साथरोग नियंत्रण महिला वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ज्ञ, अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी आयुष आयुर्वेद असे वैद्यकीय अधिकारी असा १०-१२ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ताफा तैनात असतो. पण त्यापैकी मुख्यालयी किती राहतात हा प्रश्न आहे. अनेकांनी आपले खाजगी व्यवसाय थाटले आहे. या सर्व बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ दुषित पाणी पुरवठा, उघडयावर होणारी खाद्य पदार्थाची विक्री रसायनाने पिकविलेल्या भाज्या याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे़(तालुका प्रतिनिधी)