शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘संस्कार पर्व’तून पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:52 IST

मानवी जीवनाचा सर्वांगिण विकास त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. या शिक्षणात मूल्य शिक्षणाचे संस्कार रूजविण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय,.....

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा प्रकार : मूल्य शिक्षणाच्या पुस्तकात मोदींची सौजन्यशीलता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मानवी जीवनाचा सर्वांगिण विकास त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. या शिक्षणात मूल्य शिक्षणाचे संस्कार रूजविण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय, गांधी विचार परिषद व जि.प. शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून सार्थक जीवनासाठी ‘संस्कार पर्व’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौजन्यशीलतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रूजविण्याचा प्रयत्न होत आहे. एकप्रकारे या पुस्तकाच्या माध्यमातून बालकांच्या मनावर पंतप्रधानाची छबी उमटविण्याचा प्रयत्न प्रशासनाने जाणीवपूर्वक केला आहे.वर्धा जिल्हा परिषद व इतर प्रशासकीय यंत्रणांच्या पुढाकारातून सार्थक जीवनासाठी संस्कार पर्व हे रंगीत स्वरूपाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात अर्थ नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, डीआयईसीपीडीच्या प्राचार्य रेखा महाजन, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता किरण पांडे तसेच गांधी विचार परिषदेचे अध्यक्ष भरत महोदय आदींचे संदेश आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संवेदनशिलता, वक्तशिरपणा, निटनेटकेपणा, स्त्री-पुरूष समानता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टीकोण, सर्वधर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आदी मूल्यांची ओळख करून देण्यात आली आहे. यात विविध प्रकारचे छायाचित्र संबंधित मूल्यांच्या आधारावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.निटनेटकेपणा विद्यार्थ्यांना समजावून देताना जि.प. प्राथमिक शाळा, हावरे ले-आऊट सेवाग्राम येथील छायाचित्र वापरण्यात आले आहे. याशिवाय श्रमप्रतिष्ठेची माहिती देताना याच शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो देण्यात आला आहे; पण सौजन्यशीलता हे मूल्य समजावून सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोजाणीवपूर्वक या पुस्तकात घेण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. इतर सर्व मूल्य समजावून देताना कुठेही थोरपुरूषांचे फोटो वापरण्यात आले नाही. वक्तशिरपणा समजावून सांगताना रेल्वेमागे धावणारा इसम हा फोटो वापरण्यात आला आहे; पण पंतप्रधानांची माहिती जाणिवपूर्वक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांची छबी या पुस्तकात देण्यात आली आहे. एकूणच हा सारा प्रकार प्रशासनाने पंतप्रधानासाठीच केला असावा, अशा प्रतिक्रिया आता शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडूनही उमटत आहेत.