शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

लोकोपयोगी कार्य समाजासाठी हितकारक

By admin | Updated: October 3, 2016 00:51 IST

गरज नसलेले; पण वापरण्यास योग्य कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा ते गरजूंना घालण्यास दिल्यास त्याचा सदुपयोग होतो.

पंकज भोयर : जनहित मंचाच्या कपडा बँकेचा शुभारंभ, गरजू गरिबांना कपड्यांचे वितरणवर्धा : गरज नसलेले; पण वापरण्यास योग्य कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा ते गरजूंना घालण्यास दिल्यास त्याचा सदुपयोग होतो. गरीब, कष्टकरी, वंचित व उपेक्षितांना जनहित मंचने कपड्यांची सोय करून लोकोपयोगी कार्य सुरू केले आहे. ते समाजासाठी हितकारक ठरेल, असे मत आ.डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.जनहित मंच वर्र्धाने नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून रविवारपासून वकारे बिल्डींग पाषाण चौक, मालगुजारीपुरा येथे जनहित कपडा बँक सुरू केली आहे. या कपडा बँकेचा शुभारंभ आ.डॉ. भोयर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्र्य अधिकारी व सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे, प्रकल्प प्रमुख डॉ. जयंत मकरंदे, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर भास्कर पारखी, सहसचिव प्रमोद गिरडकर, प्रशांत वकारे उपस्थित होते.आ. भोयर यांनी जनहित मंचने सुरू केलेल्या जनहित कपडा बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजाच्या विकासासाठी सामाजिक संघटनांची गरज आहे, असेही सांगितले. मेघे यांनी रोटी, कपडा आणि मकान या तीन गोष्टी मनुष्याला आवश्यक आहेत. त्यापैकी आजच्या फॅशनच्या दुनियेत काही दिवस कपडे वापरून टाकून दिले जातात. दुसरीकडे अनेकांच्या अंगावर कपडे नसतात. या विपरित स्थितीवर मात करण्यासाठी जनहित मंचने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे सांगितले. वंचित व उपेक्षितांनी या योजनेचा लाभ घ्यावा. वर्धेकरांनी वर्धा स्वच्छतेकरिता सहकार्य करावे. नवरात्री उत्सवदरम्यान शहरातील दूर्गोत्सव मंडळांनी शहर स्वच्छतेकरिता नागरिकांना वेळावेळी सूचना द्यावी, असे आवाहन बावसे यांनी केले.यावेळी आ.डॉ. भोयर यांच्या हस्ते वंचितांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख डॉ. जयंत मकरंदे यांनी केले. संचालन सुभाष पाटणकर यांनी केले तर आभार पवन बोधनकर यांनी मानले. यावेळी अनुप भुतडा, पवन बोधनकर, दिनेश रूद्रकार, पदम ठाकरे, डॉ. सतीश हरणे, अनिल नरेडी, प्रा. दिनेश चन्नावार आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)