शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचारावर जनजागृती

By admin | Updated: August 26, 2014 00:11 IST

महिला पुनर्वसन केंद्र, दत्तपूर येथे चैतन्य सेवाभावी संस्था यांच्यावतीने महिलांवरील अत्याचाराबाबत जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक अनिल पारसकर होते

वर्धा : महिला पुनर्वसन केंद्र, दत्तपूर येथे चैतन्य सेवाभावी संस्था यांच्यावतीने महिलांवरील अत्याचाराबाबत जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक अनिल पारसकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कारागृह अधीक्षक बावीसकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे, जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष संगीता धनाड्य, सामान्य रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ संजय गाठे उपस्थित होते.दत्तपूर केंद्राच्या काळजीवाहक उज्वला यांनी कार्यक्रमाला उपस्थित पीडित, अत्याचारी, निराधार महिलांना मान्यवरांचा परीचय दिला तसेच त्यांच्यासमोर अडचणी मांडण्याचे आवाहन केले.यावेळी बोलताना पारसकर यांनी येथे वास्तव्य करीत असलेल्या महिलांचे मानसिक संतुलन हे त्यांच्यावरील अत्याचारामुळे झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना नवजीवन मिळाले आहे. महिलांच्या मदतीकरिता पोलीस विभाग दक्ष आहे. यापुढे कोणत्याही महिलांवर अत्याचार होत असल्यास याची तक्रार महिलांकरिता असलेल्या हेल्प लाईनवर करावी. तसेच चाईल्ड हेल्प लाईन, कंट्रोल रूम येथेही तक्रार करता येईल. येथील महिलांना शासनाकडून आठवड्यातून एकदा समुपदेशन करण्यात येईल असेअ त्यांनी सांगितले. यानंतर बोलताना डॉ. घाटे यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली. तसेच कारागृहाचे अधीक्षक बावीस्कर यांनी मार्गदर्शन केले.मनिषा कुरसंगे यांनी भाषणातून निराधार, अत्याचार पीडित महिलांना शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या योजनेची माहिती दिली. तसेच निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता कागदपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. यासह मुलासोबत आईचे नाव लावण्याकरिता नवीन शासकीय नियमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. अनिता ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आयोजनाला अर्चना कश्यप, आशा देशमुख व आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

महिला अत्याचारावर जनजागृती महिला अत्याचारावर जनजागृती