शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती सप्ताहात विविध कार्यक्रमांतून जनजागृती

By admin | Updated: October 10, 2015 02:44 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व राज्याच्या नशाबंदी...

महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह : रॅली, चर्चासत्र, मेळावे आदी भरगच्च कार्यक्रम सादर वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व राज्याच्या नशाबंदी मंडळातर्फे जिल्ह्यात महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह दि. २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम, मेळाव्यांनी साजरा करण्यात आला. सप्ताहाला विविध महाविद्यालयाचे व शालेय विद्यार्थी व शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती. विशेषज्ज्ञांनी सप्ताहात व्यसनमुक्ती बाबत व्यापक चर्चा व जनजागृती करण्यात आली.यावेळी आयोजित महिला मेळाव्यात कृषी सभापती श्यामलता अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, पोलीस उपअधीक्षक किल्लेकर, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, तुकाराम घोडे महाराज, पुजा जाधव, म्हस्के, नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर येवतकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तुकाराम घोडे महाराज नांदेड जिल्ह्याचे म्हस्के उपस्थित होते. संचालन प्रज्ञा ब्राह्मणकर व आभार रामटेके यांनी मानले. सत्पाहात आर्वी नाका येथील वडार वस्ती मंदिराजवळ कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, तुकाराम घोडे, नशाबंदी मंडळाचे वर्धा अध्यक्ष ज्ञानेश्वर येतवकर, विशाल बुरांडे, नितेश काळे, कुंभलकर समाज कार्य महाविद्यालय येथील प्राध्यापक राम खंडकर, वडार समाजाचे अध्यक्ष गजानन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दीपाल गोरडे यांनी केले. आभा पुनम आसेगावकर यांनी मानले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला महेश पवार, पंकज वंजारे, डॉ. राम, अमोल मानकर, नितेश कराळे आणि ठाणेगाव येथील सुरेश मलवे उपस्थित होते. चर्चासत्रात समाज कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी दीपा हेरोळे, प्रमुख पाहुणे सर्पमित्र व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार, नशाबंदी मंडळाचे ज्ञानेश्वर येवतकर, सर्वोदय युवावाहिनीचे अविनाश, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके उपस्थित होते. संचालन दीपाली गोरडे यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक सुदेश कोंडे यांनी मानले. युवकांसाठी व्यसनमुक्ती सप्ताहात युवा कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडली. संचालन पूजा पवार तर आभार वीरेंद्र जळके यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)