शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी सेवेकरिता ‘तो’ पीएसआय अमरावतीत

By admin | Updated: July 16, 2015 00:05 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार शक्य असताना केवळ पोलिसांच्या सहकार्याने व्हीआयपी सेवेकरिता विनयभंग प्रकरणातील सेलू ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी या आरोपीला...

विनयभंग प्रकरणातील आरोपी : जिल्हा सामान्य रुग्णालयातही उपचार शक्यवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार शक्य असताना केवळ पोलिसांच्या सहकार्याने व्हीआयपी सेवेकरिता विनयभंग प्रकरणातील सेलू ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी या आरोपीला अमरावती येथे पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. याकरिता त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका विभाग प्रमुखाचेही सहकार्य मिळाल्याचे बोलले जात आहे.सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आदिवासी युवतीचा विनयभंग करून फरार असलेल्या या उपनिरीक्षकाला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस आल्याचे पाहुन येथूनही पसार होण्याच्या तयारीत त्याने उंचारून उडी घेतल्याने तो जखमी झाला. जखमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याने येथील उपचारावर अविश्वास दाखवित अमरावती येथे उपचार करण्याची मागणी केली. वैद्यकीय सुत्रानुसार, त्याच्यावर वर्धेत उपचार शक्य होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला आणले असता त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरिता बंदूकधारी पोलीस तैनात होते. यावरून त्याच्यावर असलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात येते. असे असताना त्याने अमरावती येथे उपचार देण्याची मागणी केली. त्याची ही मागणी तात्काळ मान्य करण्यात आली. यामुळे पोलिसांकडूनच त्याला व्हीआयपी सेवा पुरविण्यात येत असल्याचा आरोप होते आहे. त्याच्यावर उपचारानंतर अटकेची कारवाई करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याची माहिती आहे. त्याला अशाच अवस्थेत न्यायालयात हजर केल्यास कारवाई करणे कठीण जाणार असल्याचे पोलिसांकडून बोलले जात आहे. सदर उपनिरीक्षकाच्या अटकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी) चौधरीविरूद्ध पत्नीची कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार आदिवासी युवतीचा विनयभंग करणारा सेलू ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक राजू चौधरी विरूद्ध त्याच्या पहिल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केल्याची माहिती आहे. ही तक्रार तिने सन २००९ मध्ये गोंदिया पोलिसात दिली होती. या तक्रारीची चौकशी सुरू असताना राजू चौधरी वर्धेत पदोन्नतीवर आल्याची माहिती मिळताच त्याच्या पत्नीने वर्धा गाठत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी तिला ठाण्यात पाठविले. येथेही प्रकरणाची नोंद करण्यात आली. यावरून तिला महिला तक्रार निवारण कक्षात समज देण्याकरिता बोलविण्यात आल्याची माहिती आहे. याच तक्रारीत झालेल्या चौकशीची माहिती विचारण्याकरिता तिने माहितीच्या अधिकाराचा वापर केल्याची माहिती आहे. मात्र या अर्जावर स्वाक्षरी केली नसल्याने तो परत करण्यात आल्याचीही चर्चा आहे. चौधरीकडून बोरधरण परिसरात एक नाही तर अनेक प्रकार घडल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मात्र यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या तिसऱ्या आरोपीला अटक करण्याबाबत पोलीस प्रशासन उदासिन असल्याचा आरोप होत आहे.