शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बँक ग्राहकांना योग्य सोयी-सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:14 IST

गौरक्षण भागातील आंध्रा बँकेत रेल्वे कर्मचाºयांसह अनेकांची खाती आहेत; पण बँकेतील अपुºया मनुष्यबळासह अनेक अडचणींचा कामानिमित्त बँकेत येणाºया खातेदार नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देप्रहारची मागणी : आंध्रा बँकेच्या व्यवस्थापकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गौरक्षण भागातील आंध्रा बँकेत रेल्वे कर्मचाºयांसह अनेकांची खाती आहेत; पण बँकेतील अपुºया मनुष्यबळासह अनेक अडचणींचा कामानिमित्त बँकेत येणाºया खातेदार नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांचा त्रास लक्षात घेता बँक व्यवस्थापकांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली. याबाबत बुधवारी आंध्रा बँक व्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले.आंध्रा बँकेच्या गौरक्षण येथील शाखेत रेल्वे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अनेक वयोवृद्धांची खाती आहेत. तेथे कर्मचाºयांची कमतरता आहे. शिवाय बँकेचा वाढता व्याप लक्षात घेता इमारत अपुरी पडत आहे. परिणामी, कार्यालयीन वेळेत बँकेत साधे उभे राहण्यासाठीही ग्राहकांना जागा राहत नाही. शिवाय पैसे जमा करणे तथा काढण्याकरिता अपुºया खिडक्या आहेत. वयोवृद्धांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या बँक शाखेत बोरगाव (मेघे) येथील १८० बचत गटांचे आणि सावंगी (मेघे) येथील २०० बचत गटांची खाती आहेत. यामुळे येथे नेहमीच महिलांची गर्दी असते; पण येणाºया महिलांना बँकेच्या आवारात गर्दी राहत असल्याने बाहेरील झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे.हा प्रकार बँकेतील ग्राहकांच्या अडचणीत भर घालणारा ठरत आहे. असे असले तरी बँक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. ग्राहकांना सुविधा देणे, हे कर्तव्य असताना ते बजावले जात नाही. यामुळे बँक व्यवस्थापकांनी लक्ष देत त्वरित योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वेळीच विचार न झाल्यास प्रहार तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, शुभम भोयर, भूषण येलेकर, चेतन वैद्य, आदित्य कोकडवार, भुमेश कुकडकर, गोविंद दिगीकर, मयूर ढोके, राजू लढी, प्रशिल धांदे, पवन धांदे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पासबुक प्रिंटींग मशीन असते बंदआंध्रा बँकेच्या गौरक्षण शाखेतील पासबुक प्रिंटींग मशीन तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा बंदच ठेवली जाते. परिणामी, बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बँकेच्या व्यवस्थापकांनी बँकेत नवीन पासबुक प्रिंटींग मशीन लावण्याची व्यवस्था करावी, तथा अन्य समस्याही त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी प्रहार तथा ग्राहकांच्यावतीने करण्यात आली आहे.