शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निवासस्थानात सोईसुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:56 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील शासकीय निवासस्थानातील रहिवाशांना योग्य सोईसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नगराध्यक्षांना साकडे : बापु युवा संघटनची मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील शासकीय निवासस्थानातील रहिवाशांना योग्य सोईसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष अतुल तराळे यांना देण्यात आले आहे.जुन्या जि.प. कार्यालयासमोरील या शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीतीत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी राहतात. इमारत क्रमांक १ मध्ये १६ परिवार, इमारत क्र. १/ए मध्ये ८ परिवार, इमारत क्र. २/बी मध्ये १६ परिवार, इमारत क्र. २/ए मध्ये ८ परिवार राहत असून इमारत परिसरातील एकच बोरवेलच्या सहाय्याने तेथील रहिवाशांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेथे उन्हाळ्याच्या दिवसी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होते. याचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. येथील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात याव्या. जिल्हा शल्य चिकित्सांनी नगर परिषदेला पत्र लिहित त्यातून सदर इमारतीतील रहिवाशांना नळ जोडणीचा लाभ ेदेण्याची मागणी केली आहे. ही मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी. इमारत परिसर न.प.च्या स्वच्छता कर्मचाºयांकडून नियमित स्वच्छ करण्यात यावा. तेथे मोकाट श्वानांचा वावर असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नारिकांना सुविधा होईल यासाठी इमारत परिसरात ठिकठिकाणी बसण्याचे सिमेंटचे बेंच लावण्यात यावे, इमारत परिसरात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावा, आदी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना सुरेश पट्टेवार, मनोज खैरकार, निलीमा निहारे, के. आर. बिडकर, शालिनी शैलारे, सुरेखा माटे, वंदना गौरखेडे, मनीषा पाटील आदी उपस्थित होते.जल संकटाला जावे लागते सामोरेआरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या या निवास स्थानाच्या इमारत परिसरात एकच बोरबेल आहे. तीही उन्हाळ्याच्या सुरूवातीला तळ गाठते. त्यामुळे येथील रहिवाशांना कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागते. रहिवाशांची समस्या लक्षात घेता सोयी-सुविधा देण्याची मागणी आहे.