शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक महा ई- सेवा केंद्रावर आधार कार्ड केंद्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:16 IST

प्रत्येक बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करण्याचा नियम शासनाने केला आहे; पण वृद्ध नागरिकांकडे पूर्ण जन्म तारखेचे आधार कार्ड वा जन्म दाखला नाही. परिणामी, त्यांचे पॅन कार्डही तयार होत नाही. मग, बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक कसे करणार, हा प्रश्नच आहे.

ठळक मुद्दे नागरिकांची मागणी : वेळेची होईल बचत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करण्याचा नियम शासनाने केला आहे; पण वृद्ध नागरिकांकडे पूर्ण जन्म तारखेचे आधार कार्ड वा जन्म दाखला नाही. परिणामी, त्यांचे पॅन कार्डही तयार होत नाही. मग, बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक कसे करणार, हा प्रश्नच आहे. यासाठी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर आधार कार्ड केंद्र द्यावे, अशी मागणी भारतीय नागरिक अधिकार सामाजिक न्याय परिषदेने केली आहे.आधार कार्डमधील जन्म तारीख, नाव, पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जी कागदपत्रे दिली जातात, त्यांच्याच आधारावर कार्डमध्ये दुरूस्ती करून देण्याचा शासकीय नियम केंद्र शासनाने करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबत भारतीय नागरिक अधिकार सामाजिक न्याय परिषदेचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते शोऐब अहेमद कन्नौजी, बेग दिलदार उर्फ समीर, सैय्यद रशीद अली, कय्युम मजीद खान, शेख मोहम्मद शफी, नौशाद अब्बास शहा, जयवंत हराळे, भूषण भिसे, प्रणय नरांजे, गणेश जाधव, वच्छला कांबळे, वैशाली हराळे, नारायण भीसे, ईश्वर कोकाटे, वृशाली कोकाटे, प्रथमेश अंबुलकर, सुरेश नेहारे, उषा नेहारे, तनुश्री नेहारे, प्रथमेश नेहारे, शमशाद बेगम, सायरा बी शेख, नेहा नेहारे, हर्षल नेहारे, यश नेहारे, समीर नेहारे, सेवक लांजेवार, कविता लांजेवार, समीर लांजेवार, विहान जाधव, शुत्रिका जाधव, पूर्वी बाभुळकर, अनुज घुंगरे, श्रेया हराळे, आकृती हराळे, सोनम घुंगरे, दर्शना हराळे, बबन घुंगरे, योगिता घुंगरे, ज्योती हराळे, रूपाली हराळे, तेजराव मांजरे आदींनी निवेदन दिले आहे.आधार कार्ड, बँक खाते, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक आदी लिंक करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रारंभीच्या आधार कार्डमध्ये संपूर्ण जन्म तारखेची नोंद नाही. इंग्रजीत स्पेलिंग दुरुस्ती वा मराठीमध्ये त्रूटीयुक्त नावे असल्याने स्वत:च्या नावाची दुरूस्ती करण्यासाठी स्वत:चे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज भासत आहे. वर्धा शहरात अनेक महाआॅनलाईन सेवा केंद्र आहेत; पण या केंद्रांमध्ये मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड, बँक खाते व इतर शासकीय योजनेत आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा नाही. परिणामी, नागरिकांना अन्यत्र भटकंती करावी लागते. बहुतांश शाळांतील विद्यार्थ्यांचे नवीन आधार कार्ड अद्याप तयार करण्यात आलेले नाही. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आहे; पण त्यांच्या आधार कार्डमध्ये इंग्रजीतील नावात स्पेलींग मिस्टेक तथा मराठी नावात काना, मात्रा, उकार, विलांटी आदींच्या त्रूट्या आहेत. अनेकांच्या कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद असण्याऐवजी केवळ जन्माचे वर्ष लिहिलेले आहे. या त्रूट्यांमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. या चुका दुरूस्त करण्याकरिता आधार केंद्रामध्ये तसेच पॅन कार्ड सेवाकेंद्रात जन्म तारखेच्या व नावाच्या संदर्भात ओरिजनल लिव्हींग सर्टीफिकेट मान्य केले जात नाही. यामुळे त्यांच्या आधार कार्डातील त्रूटी दुरुस्त होत नाही. विशेषत: विवाहित महिलांचे नाव आधार वा पॅन कार्डवर दुरुस्त करताना रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट वा गॅजेट सर्टिफिकेट मान्य केले जाते. गॅजेट करण्याकरिता एक ते दीड हजार रुपये खर्च येतो. आधारमध्ये नाव दुरुस्त करीत असताना गॅजेट पेपर नसल्यास नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्र बनवून आणावे, असे आधार केंद्राचे संचालक अर्जदाराला सांगतात. नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्र बनविण्यासाठीही एक ते दोन हजार रुपये खर्च करावा लागतो. सोबत मानसिक त्रास होत असून हा दूर करणे गरजेचे आहे.जन्माचे दाखले नसल्याने वृद्धांची होते गोचीअनेक नागरिकांच्या आधार कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद नाही. परिणामी, त्यांना पॅन कार्ड तयार करून मिळत नाही. नवीन पॅन कार्ड तयार करायचे असल्यास यासाठी लागणारे दस्तावेज, जन्म तारखेचा दाखला वा आधार कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद असणे गरजेचे आहे. असे असले तरी वृद्ध नागरिकांकडे जन्म दाखला नसल्याने तथा आधार कार्डवर पूर्ण जन्म तारखेची नोंद नसल्याने पॅन कार्ड तयार करणारी एजन्सी पॅन कार्ड तयार करून देत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्म तारखेची नोंद असल्याने ते ग्राह्य धरणे गरजेचे आहे; पण लिव्हींग सर्टिफिकेटला पॅन कार्ड एजन्सी मान्य करीत नाही. यामुळे नागरिकांना पॅन कार्डपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, पॅन कार्ड तयार करताना नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व आॅनलाईन होत असल्याने हा मानसिक, आर्थिक त्रास दूर करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.