शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाविरोधात अंगणवाडी सेविकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:15 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नवा निर्णय रद्द करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयामुळे अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, कमी विद्यार्थी असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाºयांना समाधानकारक मानधन देण्यात यावे, थकीत आहाराचे देयके तात्काळ देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत असलेला प्रवास भत्ता त्वरित देण्यात यावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लावून धरल्या होत्या. धरणे आंदोनादरम्यान काही अंगणवाडी सेविकांनी मनोगत व्यक्त करताना त्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मांडून शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.आंदोलनादम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविले.आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजया पावडे, जिल्हा संघटक असलम पठाण, मंगला इंगोले, सरचिटणीस वंदना कोळणकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वरी डंभारे, मैना उईके, सुनंदा आखाडे, शोभा सायंकार, रेखा काचोळे, शोभा तिवारी, नलिनी चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.