शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गावाची समृद्धी ग्रामविकासाचा कळस तर ‘पाणी' म्हणजे पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:25 IST

ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देसुमित वानखेडे : वॉटरकप स्पर्धा २०१९ च्या नियोजनावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.याप्रसंगी पंचायत समिती आर्वीचे उपसभापती प्रा. धर्र्मेंद्र राऊत, विभागीय कृषी अधिकारी सांगाळे , उपविभागीय अधिकारी संदेश ससाणे , गटविकास अधिकारी मडावी, तहसिलदार विजय पवार यांच्या सह पाणी फाऊंडेशनचे समन्वयक व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव उपस्थितीत होते.पाणी फाऊंडेशनच्यावतीने पंचायत समिती आर्वी येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घघाटन सुमित वानखेडे यांनी केले. प्रदर्शनीत दुष्काळाची विदारकता ते दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली जात आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनीचा लाभ घेत आपला परीसर जल समृद्ध करावा असे आवाहन भुषन कडू यांनी केले आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुमित वानखेडे म्हणाले की, गावाची समृद्धी ही पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असून पाणी फाऊंडेशन गावे जल समृद्ध करण्यासाठी एक निमित्त आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तांत्रिक बाबीवर काम केल्यास गावांची पाणी समस्या दुर होऊन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. गेल्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झालेल्या गावात परिणाम दिसत आहेत. गावे जल समृद्ध होत आहे. आतापर्यंत दोन वर्षांत काम करणाºया गावांना कुठल्याही बाबींची कमतरता भासू दिली नाही आणि यावर्षी देखील सर्वतोपरी मदत शासन, संस्था व्दारे करण्यात येईल. यावर्षी परत पहीले बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करूया. तरूणांनी जलसंधारणाच्या चळवळींमध्ये सक्रियतेने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बॉक्सशेतकरी कंपनी स्थापन कराशाश्वत विकास करायचा असेल तर सर्व गावकºयांनी एकत्र येऊन शाश्वत विकास साध्य करता येईल. पाणी उपलब्ध असल्यास शेतीतून चांगले पिक घेता येते. उत्पन्न वाढीसाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून स्वत: ची कंपनी स्थापन करून शेतमालाची विक्री बाहेरील उद्योग समुहास थेट करता येईल. आखाती व इतर देशात जैविक उत्पादनाला प्रचंड मागणी आहे, असे वानखेडे म्हणाले.