शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकेने घेतला गाळ्यांचा प्रतिकात्मक ताबा

By admin | Updated: February 15, 2017 02:13 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यात मंगळवारी वर्धेतील सोशालिस्ट

बँकेची कर्ज वसुली मोहीम जोरात : सात दिवसांच्या मुदतीवर पथक परतले वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यात मंगळवारी वर्धेतील सोशालिस्ट चौक परिसरातील एका कॉम्प्लेक्समधील चार गाळे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. वसुली पथकाने गाळेधारकास कारवाईबाबत कागदपत्रे सोपवित विहित कालावधीत कजार्ची परतफेड करण्याची सूचना दिली. जिल्हा बँकेचे ३०० कोटी रुपयांवर कर्ज थकित आहे. बँकेकडून कर्ज वसुलीकरिता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील एका कॉम्प्लेक्समधील गाळेधारकाकडे २००३ पासून बँकेचे ५२ लाख ६३ हजार ३०७ रुपयांचे कर्ज आहे. कर्जाची परतफेड करण्याबाबत बँकेकडून संबंधितास वेळोवेळी सूचना देण्यात आल्या; पण कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या वसुली पथकाने दुकान गाठून जप्तीची कारवाई केली. या पथकात जिल्हा बँकेचे व्यवस्थापक तथा अधिकृत अधिकारी संजय कोरडे, अनिल मडावी, एन.एन. संसारे, गणेश राऊत, अनिल जाधव, महेश मुळे, वाकोडकर यांचा समावेश होता. बँक अधिकाऱ्यांनी व्यावसायिकास सूचना देत गाळ्यांचा ताबा घेत असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी कारवाईची कागदपत्रे व्यावसायिकास दिल्यानंतर व्यावसायिकाने सात दिवसांत कर्जाची परतफेड करण्याची हमी अधिकाऱ्यांना दिली. यामुळे अधिकाऱ्यांनी व्यावसायिकास कर्ज परतफेडीकरिता सात दिवसांची मुदत देत प्रतिकात्मक जप्तीची कारवाई केली. वेळेत कर्जाची परतफेड न केल्यास लिलावाची प्रक्रिया होईल, असे व्यवस्थापक कोरडे यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)