शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट रेती उपस्यामुळे घाट ‘कॅन्सलेशन’चा प्रस्ताव

By admin | Updated: March 30, 2015 01:48 IST

रेती चोरीवर आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जातात; पण ती थांबत नसल्याचे दिसते़ देवळी तालुक्यातील आपटी या घाटावरही रेतीची चोरी होत आहे़ ...

वर्धा : रेती चोरीवर आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जातात; पण ती थांबत नसल्याचे दिसते़ देवळी तालुक्यातील आपटी या घाटावरही रेतीची चोरी होत आहे़ २२५ ब्रास रेती उपस्याची परवानगी असताना घाट धारकाने दोन महिन्यांतच तब्बल ५५० ब्रास रेतीचा उपसा केला़ ही बाब उपविभागीय अधिकाऱ्यांनी रविवारी घातलेल्या धाडीत समोर आल्याने घाट रद्द करण्याचा अहवाल सादर केला जाणार आहे़ देवळी तालुक्यातील वर्धा नदीवरील आपटी या घाटाचा लिलाव झाला होता़ सदर घाट अतूल प्रतापराव मोहिते रा़ उमरस, ता़ कराड, जि़ सातारा यांनी घेतला़ या घाटातून एकूण २२५ ब्रास रेतीच्या उपस्याची परवानगी होती़ शिवाय पात्रामध्ये पाण्यावर दोन फुट थर असलेल्या रेतीचाच उपसा करण्याची परवानगी देण्यात आलेली होती़ असे असताना या घाटातून बोट व सक्शन पंपच्या साह्याने रेतीचा उपसा सुरू होता़ या घाटातून दोन महिन्यांतच तब्बल ५५० ब्रास रेती उपसण्यात आली़ रेतीचोरी थांबविण्यासाठी म्हणून सुरू करण्यात आलेल्या शासनाच्या ‘स्मॅट’ या एसएमएस सिस्टीमवर मात्र केवळ १८ ब्रास रेतीचा उपसा झाल्याची नोंद आहे़ याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे़ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या धाडीत घाटावर तीन बोटी, सक्शन पंप, एक पोकलॅण्ड, तीन ट्रक आणि चार ट्रॅक्टर दिसून आले़ घाटाचा पंचनामा करण्यात आला असून दुसरी कारवाई असल्याने सदर घाट रद्द करण्यात यावा, असा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली़ या कारवाईत देवळीचे तहसीलदार जितेंद्र कुवर, कोतवाल सुनील इवनाथे, एसडीओ कार्यालयाचे विलास बढे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले़ (कार्यालय प्रतिनिधी)