शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानवाच्या विकासासाठी पोषण आहार योग्य अत्यावश्यक

By admin | Updated: July 23, 2016 02:42 IST

सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे.

अशोक पावडे : पोषण आहारांतर्गत परसबाग प्रशिक्षण कार्यशाळा वर्धा : सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे. गावपातळीवर प्रत्येक घरी, शासकीय कार्यालय परिसरात परसबागेमध्ये शास्त्रशुद्ध सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला व फळझाडांची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनचे उपसंचालक अशोक पावडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत पोषण आहार संदर्भात परसबाग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पावडे बोलत होते. यावेळी राजमाता मिशनचे एमआयएस व्यवस्थापक उल्हास खळेगावकर, महिला बाल कल्याण चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे, अश्विनी पाटील उपस्थित होत्या. पावडे म्हणाले, गावपातळीवर असलेल्या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व घरोघरी लोकसहभागातून परसबाग तयार करावी. शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब आणि सेंद्रीय खताचा वापर करून भाजीपाला, फळझाडे लावावी. यामुळे सध्या बाजारात येणाऱ्या रासायनिक पद्धतीच्या आहाराला आळा बसून गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या पोषणामुळे गर्भवतींना व बालकाांना सकस आहार मिळून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. पोषण आहार चळवळीसाठी राज्यातील ६ जिल्ह्याचा समावेश असून वर्धा जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने येथे सुद्धा प्रायोगिक तत्वावर पोषण चळवळ सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन गावपातळीवर लोकसहभाग घेऊन परसबाग तयार करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. खळेगावकर यांनी सुद्धा पोषण आहार चळवळीविषयी मार्गदर्शन केले. अश्विनी पाटील यांनी परसबाग कमी जागेत, कमी खर्चात आणि सेंद्रीय खत निर्मित कशी करावी यावर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. कार्यशाळेला जिल्हा परिषदचे सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)