शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राममध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन; दशपर्णी अर्क ठरतोय प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:44 IST

सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

ठळक मुद्देआश्रमच्या शेती विभागाचा प्रयोग उत्पादन खर्चाला बसतोय आळा

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बियाण्यांसह खतांच्या किंमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि त्या तुलनेने हमीभावातील अत्यल्प वाढ, ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडविणारी आहे. तसेच कोरोनाच्या प्रकोपामुळे खतांचाही तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा मंत्र देणाऱ्या सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

भरघोस उत्पादनाच्या लोभापायी रासायनिक खते व कीटकनाशांचा वापर वाढला. परिणामी, जमिनीसह नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. आरोग्याच्या परिणामांमुळे आता सेंद्रिय शेतीकडे कल वाढत आहे. सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमात सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जाते. फवारणीकरिता कीटकनाशके न वापरता विविध अर्कांचा वापर केला जातो. या अर्कनिर्मितीची सर्व प्रक्रिया आश्रमातच केली जाते. आश्रम परिसरातील दहा झाडांची पाने गोळा करून त्यापासून अर्क तयार केला जात असल्याने त्याला दशपर्णी अर्क म्हणतात. आश्रमच्या शेतीत सर्व प्रकारचे धान्य आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. यावर कीड, अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने दशपर्णी अर्काची फवारणी करून रोगावर नियंत्रण मिळविले जाते. येथे कोणतीही औषधी किंवा अर्क बाजारातून विकत घेतला जात नाही. या सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार होत असल्याने शेतकऱ्यांचाही कल वाढत आहे.असा तयार होतो दशपर्णी अर्कसेवाग्राम आश्रमात दशपर्णी अर्क तयार करण्याची लगबग सुरू आहे. यामध्ये धोत्रा, बेल, येरंडी, घंटुला, रुई, कडूनिंब, अडुळसा, बेशरम, करंज व निलगिरी या दहा झाडांची पाने गोळा केली जातात. यामध्ये दहा लिटर गोमूत्र, पाच लिटर पाणी यांचे एका ड्रममध्ये द्रावण तयार करून त्यात या सर्व झाडांची पाने टाकली जातात. पंधरा दिवस ठेवल्यानंतर गाळून त्याचे द्रावण फवारणीकरिता उपयोगात आणले जाते. एका फवारणी पंपासाठी शंभर मि.ली. अर्क वापरल्याने रोगावर नियंत्रण मिळविता येते.

आश्रमात बहुगुणी झाडांची उपलब्धीआश्रमामध्ये सर्व प्रकारची झाडे आहेत. ही झाडे आयुर्वेदिक असून देशी असल्याने बहुगुणी आहेत. याचा उपयोग आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याने कुठलेही दुष्परिणाम यातून होत नाही. दशपर्णीच्या फवारणीमुळे पिकांवर आणि उत्पादनावर रासायनिक खते व कीटकनाशकासारखे परिणाम दिसून येत नाही. त्यामुळेच आश्रमातील उत्पादनांची मागणी वाढली आहे. अर्क बनविण्यासाठी शेती विभागप्रमुख नामदेव ढोले, आकाश लोखंडे, सचिन हुडे, मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर, माधुरी चांभारे व सचिन बहादुरे आदी सहकार्य करीत आहेत.

आश्रमाकडे सध्या ८० एकर शेती असून त्यापैकी ३४ एकर शेती ठेक्याने दिली आहे, तर उर्वरित शेतीमध्ये विविध पिके घेतली जात आहेत. सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जात आहे. यामध्ये लागणारे गोमूत्र, शेणखत आणि झाडांची पाने आश्रम परिसरातच उपलब्ध होत असल्याने लागणारा खर्च अत्यल्प आहे. सेंद्रिय शेतीतून शेतकरी चांगल्याप्रकारे उन्नती साधू शकतो.मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान

टॅग्स :agricultureशेतीSewagramसेवाग्राम