शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:24 IST

राजकारणासह शिक्षणातही जातींचा शिरकाव झाला आहे. जातीव्यवस्था नष्ट करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्याकरिता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जातीअंताचा लढा वर्गीय लढ्यासोबत लढला गेला पाहिजे.

ठळक मुद्देकुमार शिराळकर : जाती अंत संघर्ष समितीचे संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राजकारणासह शिक्षणातही जातींचा शिरकाव झाला आहे. जातीव्यवस्था नष्ट करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्याकरिता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जातीअंताचा लढा वर्गीय लढ्यासोबत लढला गेला पाहिजे. जाती-धर्म व्यवस्था आणखी मजबूत करणाऱ्या व्यवस्थेविरोधात तो लढला गेला पाहिजे, असे प्रतिपादन कुमार शिराळकर यांनी केले.जाती अंत संघर्ष समितीचे संमेलन संत कंवरराम धर्मशाळा, वर्धा येथे पार पडले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जाती अंत संघर्ष समितीचे राज्य संयोजक शैलेंद्र कांबळे, माकपाचे नगरसेवक यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, दुर्गा काकडे, प्रतीक्षा हाडके, प्रा. शेख हाशम, महाराष्ट्र अंनिसचे गजेंद्र सुरकार, संयोजक नरेंद्र कांबळे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरूवात स्वं. प्रभा घंगारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत प्रीतम हिराणी, समीर बोरकर, पालक फुलकर, रामभाऊ ठावरी, मुकुंद नाखले, दिनेशे धुर्वे, रंजना सावरकर, आशा ईखार, गणपत मेंढे, चंद्रभान नाखले यांनी केले.मनोगत व्यक्त करताना नगरसेवक यशवंत झाडे म्हणाले की, जाती अंत संघर्ष समिती वर्धा जिल्ह्यात कार्यरत झाली आहे. जाती प्रथा निर्मुलनासोबतच कष्टकरी, दलीत, आदिवासी, महिला अन्यायाच्याविरूद्ध संषर्घ करून श्रमिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य होणार आहे. जाती व्यवस्था देशाच्या विकासाला बाधक आहे. तिचा मुळासकट नायनाट करणे गरजेचे आहे. कागदपत्रावरून जात काढली म्हणजे ती नष्ट होत नाही. ती मानवाच्या सामाजिक जीवनातून नष्ट केली पाहिजे. सामाजिक अत्याचार व आर्थिक विषमतेचे बळी दलीत, आदिवासी, भटके बहुजन समाजातील कष्टकरी गरीबच ठरतात. म्हणून या जाती अंत समितीचा विस्तार केला जावा, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेख हाशम व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे गजेंद्र सुरकार यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्यालयाबद्दल कुमार शिराळकर, शैलेंद्र कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आंतरजातीय विवाह करणाºया १० जोडप्यांना यावेळी गौरविण्यात आले. यात शकील मकसूद तेल्हे, रंजना बाबू समुद्रे, प्रतीक्षा संतोष हाडके, सुवर्णा अविनाश मांगलेकर, रूपाली चंद्रकांत कच्छवा, जया प्रदीप पाटनकर, प्रिती नितेश पेढेकर, पूजा रवींद्र कांबळे, दीपा पारस मसराम यांचा समावेश होता. कार्यक्रमादरम्यान घंगारे सांस्कृतिक मंचच्या संध्या संभे, कल्पना चहांदे, संजय भगत यांनी जातीव्यवस्थे विरोधी असलेले स्वरचीत गीत सादर केले.कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रंजना सावरकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. यात गजू ढोरे, राजू फुसाटे, प्रभाकर धवने, प्रफुल लोणकर, रवींद्र हटकर, विनोद नगराळे, विष्णू उईके, पांडूरंग राऊत, जगन चांभारे, विनोद तडस, समीर बोरकर, डी. एन. हिवरे, अशोक नागतोडे, प्रितम हिराणी, दिनेश धुर्वे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजन समितीतील सदस्यांनी सहकार्य केले.