शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार निर्मितीक्षम उद्योगांना प्रोत्साहन

By admin | Updated: November 29, 2015 02:56 IST

औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासास प्राधान्य देताना जिल्ह्यातील युवा उद्योजकांनी उत्पादन क्षेत्राशी..

आशुतोष सलील : जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठकवर्धा : औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासास प्राधान्य देताना जिल्ह्यातील युवा उद्योजकांनी उत्पादन क्षेत्राशी निगडीत उद्योग सुरू केल्यास त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल. युवकांमध्ये कौशल्य विकास, उत्पादन क्षेत्रासह आवश्यक मनुष्यबळ निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी सलील बोलत होते. बैठकीला जिल्ह्यातील उद्योजक तसेच उद्योगमित्र समितीचे सदस्य प्रवीण हिवरे, भूषण वैद्य, हरीश हांडे, बी.एम. लोमटे, एस.बी. गणराज, आर.डी भोयर, एमआयडीसीचे आमटे, एम.ए. यादव, लीड बॅकेतर्फे मुरलीधर बेलखोडे आदी उपस्थित होते.देवळी औद्योगिक केंद्र सामूहिक सुविधा केंद्राचा विकास करणे, रस्ते, ट्रक टर्मिनल आदी सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देताना सलील म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात ज्या उद्योजकांनी उद्योग सुरू केले नाही, त्यांनी त्वरित उद्योगाची उभारणी करावी व अहवाल सादर करावे, अशा सूचना दिल्या. देवळी औद्योगिक क्षेत्रात पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी द्यावी. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मिती करणाऱ्या व उत्पादन क्षेत्राशी निगडीत उद्योगांना प्राधान्य द्यावे. बँकांनीही अशा उद्योगांना कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना देत उद्योजकांना आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले. उद्योजकांनी आपले प्रश्न यावेळी मांडले.(कार्यालय प्रतिनिधी)