शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी करावी

By admin | Updated: February 6, 2017 01:08 IST

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत मतदारांना माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या

चंद्रकांत पुलकुंडवार : जिल्हाधिकारी कार्यालयात जि.प. व पं.स निवडणूक आढावा वर्धा : उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत मतदारांना माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे व मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स लावून करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जि.प., पं.स. निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला निवडणूक निरीक्षक भंडाराचे अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे, वर्धेचे अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक एन.के. लोणकर उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी ईव्हीएम तपासणी, मॉक पोल यासारख्या प्रक्रिया राबविताना राजकीय पक्ष व उमेदवारांना नोटीस देऊन आमंत्रित करावे. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करावे. प्रचारासाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी सभेच्या मैदानाचे नियोजन करावे. निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समितीची बैठक प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात यावी, अशा सूचनाही पुलकुंडवार यांनी दिल्या. स्थीर निगरानी पथकाने प्रत्येक नाक्यावर वाहनांची तपासणी करून दारू, पैसा यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी. निवडणूक खर्च समिती व चित्रीकरण पथकाने समन्वय साधून काम करीत उमेदवारांच्या खर्चाचा योग्य हिशेब ठेवावा, अशा सूचना निवडणूक निरीक्षक डांगे यांनी दिल्या. मतमोजणी कक्ष व स्टाँग रूमसाठी योग्य ठिकाणाची निवड करावी. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बीएलओ यांना मतदार याद्या घेऊन बसण्याची व्यवस्था करावी. मतदारांना मतदान चिठ्ठी घरपोच द्यावी, अशाही सूचना दिल्या. बैठकीला आठही जि.प. व पं.स. निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)