शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

१०० वर्षांच्या सागवृक्ष ‘ग्लोरी आॅफ वर्धा’चे संवर्धन

By admin | Updated: May 7, 2016 02:08 IST

वन विभागाच्या ढगा येथील राखीव वनक्षेत्रात वादळामुळे उन्मळून पडलेल्या आणि १०० वर्षाचे आयुष्य असलेल्या विशाल सागवान वृक्षाचे संवर्धन करून वनसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

वर्धा वनविभागाचा ‘राम’ आता वन संग्रहालयात : १४.२० मीटर लांबी, ३.२० मीटर गोलाईवर्धा : वन विभागाच्या ढगा येथील राखीव वनक्षेत्रात वादळामुळे उन्मळून पडलेल्या आणि १०० वर्षाचे आयुष्य असलेल्या विशाल सागवान वृक्षाचे संवर्धन करून वनसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. ग्लोरी आॅफ वर्धा म्हणून ओळख असलेल्या सागवान वृक्षाची लांबी १४.२० मीटर असून छाती उंचीवर ३.२० मीटर गोलाई आहे. सध्या सागवान वृक्ष बांगडापूर येथील वन विभागाच्या परिसरात ठेवण्यात आला आहे.अत्यंत दुर्मिळ अशा सागवान वृक्ष २१४ क्रमांकाच्या ढगा बीटच्या नाल्याच्या काठावर वादळी पावसात पडले होते. या महाकाय वृक्षाचे संवर्धन करून ते अभ्यासकांसाठी वनसंग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.वर्धा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान प्रजातीचे वृक्ष असून वर्धेच्या सागवानासंदर्भात बोलताना उपवनसंरक्षक पगार म्हणाले की, खरांगणा, ढगा हे समृद्ध क्षेत्र आहे. येथील सागवानाच्या लाकडाच्या बुंधा हा पोकळ असतो. वादळात पडलेल्या सागवान वृक्षासह बुंधासुद्धा खोदून काढून मुळासह काढण्यात आले आहे. ढगा येथून बांगडापूर येथील वन डेपोपर्यंत वाहतुकीसाठी २० वन कामगार, २० अधिकारी व कर्मचारी यांच्या तब्बल १२ ते १३ तासाच्या प्रयत्नाने लांब १८ चाकाच्या ट्रक, ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने रात्री ११ वाजता बांगडापूर शेडमध्ये ठेवण्यात यश आले. या महाकाय वृक्षाचा बुंधासुद्धा वन निरीक्षण कुटीत ठेवण्यात आला आहे. या सागवानाची किंमत पाच लाखापेक्षा जास्त असून वाहतुकीसाठी ४२ हजार रुपयांचा खर्च आला आहे.(प्रतिनिधी) जिल्ह्यात पाच जैवविविधता पार्कवर्धा जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदेची माहिती व्हावी तसेच वनसंवर्धन व संगोपनासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी पाच जैवविविधता पार्क तयार करण्यात येणार आहेत. जैवविविधता पार्क सेलूकाटे, ढगा, सारंगपूरी, बोरधरण व पवनार येथे होणार आहेत. प्राईड आॅफ वर्धा हे सागवानाचे वृक्ष जैवविविधता पार्कात ठेवण्यात येणार आहे.वर्धा वनक्षेत्रात सागवानाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात असले तरी शंभर वर्ष आयुष्य व लांबी आणि रूंदी असलेले हे महाकाय वृक्ष एकमेव आहे. त्यामुळे याचे वन संग्रहालयात संवर्धन करण्यात येणार आहे. प्राईड आॅफ वर्धाचे ढगा ते बांगडापूर आॅपरेशनसाठी वनक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही. तळणीकर, एस.बी. तळवतकर, बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.