शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेचा वर्धेत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:13 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ला निंदनीय आहे.

ठळक मुद्देआरपीआयच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर जाळले टायर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ला निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे म्हणत स्थानिक जिल्हा कचेरीसमोर आरपीआय (आ) गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी टायर जाळून रोष व्यक्त केला.ना. आठवले यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी रेटली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आलेल्या आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सुरूवातीला घोषणाबाजी केली. त्यानंतर रस्त्यावर टायर जाळून सदर घटनेचा निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्त्व जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी केले. आंदोलनात वसंत भगत, दिलीप सुखदेवे, प्रकाश पाटील, अजय मेहरा, देविदास भगत, सुभाष सहांदे, देवानंद तेलतुंबडे, धम्मा शंभरकर, सतीश इंगळे, संजय वर्मा, विजय नगराळे, मोहन वनकर, संजय गवई, विनोद वाघे, सुरेंद्र पुनवटकर, संजय नगराळे, गौतम सबाने, अशोक मेश्राम यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.वर्धा बंदचे आवाहनआरपीआय (आ.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार १० डिसेंबरला आरपीआयच्यावतीने वर्धा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात व्यापाऱ्यांसह वर्धेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी केले आहे.