शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

हिंगणघाटमध्ये झिरो बजेट चित्रपटाची निर्मिती

By admin | Updated: August 28, 2016 00:34 IST

मोबाईलच्या सहाय्याने केवळ ३ हजार रुपयांत ५० मिनिटांचा व्यावसायिक लघु चित्रपट बनविण्याचा निर्धार स्थानिक कलावंतांनी पूर्ण केला आहे.

कलावंताचा अनोखा प्रयोग : केवळ मोबाईलद्वारे चित्रीकरणहेमंत चंदनखेडे  हिंगणघाटमोबाईलच्या सहाय्याने केवळ ३ हजार रुपयांत ५० मिनिटांचा व्यावसायिक लघु चित्रपट बनविण्याचा निर्धार स्थानिक कलावंतांनी पूर्ण केला आहे. ‘अ‍ॅक्युलस द वे आॅफ लुकींग’ (पाहण्याचा बदललेला दृष्टीकोन) असे या चित्रपटाचे नाव असून त्याच्या प्रिमिअर शोला हिंगणघाटकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील एका चित्रपटगृहात नुकताच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील एक नायिका वगळता सर्व कलावंत हिंगणघाटच्याच मातीतले आहेत. विशेष म्हणजे चित्रपटासाठी हे सर्वच कलाकार नवखे आहेत. हा अख्खा चित्रपट मोबाईलच्या सहाय्याने चित्रित करण्यात आला आहे. केवळ २० दिवसांत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विना मानधन तत्वावर सदर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्वत:च निर्माता, निर्देशक, लेखक असलेले स्थानिक कलावंत इंद्रजीत आणि त्यांचा मुलगा केतन तायवाडे यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माता निर्देशक असलेले इंद्रजीत तायवाडे हे रंगमंचावरील जुने कलाकार आहेत. आपण एखादा चित्रपट तयार करण्याची त्यांची इच्छा होती. याकरिता लागणारे कुठलेही भागभांडवल त्यांच्याकडे नव्हते; परंतु दुर्दम्य विश्वास आणि मुलगा केतनच्या साथीच्या जोरावर त्यांनी सदर चित्रपट केवल मोबाईलच्या मदतीने पूर्ण केला. विशेष म्हणजे चित्रपटाच्या तांत्रिक बाबीही त्यांनी मोबाईलवरूनच पूर्ण केल्या. त्यामुळे चित्रपटाचा प्रिमियर शो पाहताना स्वत:वरच विश्वास बसत नसल्याचे तायवाडे यांनी सांगितले. या चित्रपटाची नायिका रूची जांभुळे ही भंडारा येथील असून इतर सर्वच कलावंत हिंगणघाट परिसरातील आहेत. चित्रपटातील तिचे नाव ‘राणी’ असून तिच्याभोवतीच कथानक फिरते. स्थानिक कलावंत विकी आगरकर (चित्रपटातील नाव- छोटा पाटील) याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. आईची भूमिका शिवाणी घोडे यांनी साकारली आहे. संपूर्ण चित्रपट हा हिंगणघाट परिसरातच बसस्थानक, उड्डाण पुल, जुनी वस्ती या भागात चित्रित करण्यात आला आहे. हिंगणघाटच्या कलावंतांनी तिथल्याच मातीत बनविलेला हा चित्रपट पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. निर्मितीसाठी या दोघांना अभिजित आणि सुशिल घोडे यांनी सहकार्य केले. प्रिमियर शोला माजी आमदार राजू तिमांडे, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, उपाध्यक्ष अमोल बोरकर, मनविसेचे राहुल सोरटे, गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर शाकीर खान पठान, आपचे मनोज रूपारेल आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.