शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरातील मिरचीतून पाच लाखांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

पुलगाव नजीकच्या रोहणी (वसू) येथील शेतकरी महिला नीता मनोज वसू यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पिकांसोबत दीड एकरात मिरचीची लागवड केली. दीड एकर जागेवर मिरचीची लागवड करण्यासाठी नर्सरीत तयार झालेली साडेसात हजार रोपटे सव्वा रुपये नगाप्रमाणे विकत आणली. दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवून योग्य मशागत केल्याने शेतातील मिरची चांगलीच बहरली. 

ठळक मुद्देरोहणीच्या शेतकरी महिलेची यशोगाथा

देवकांत चिचाटेलोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : निसर्गकोप आणि रोगराईमुळे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांसह भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे. पारंपरिक पिकांसोबत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले जात असून यात शेतकरी महिलाही कुठे मागे नाहीत. रोहणी येथील एका शेतकरी महिलेने दीड एकरामध्ये मिरचीची लागवड करून तब्बल पाच लाखांचे उत्पन्न मिळवून प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. पुलगाव नजीकच्या रोहणी (वसू) येथील शेतकरी महिला नीता मनोज वसू यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पिकांसोबत दीड एकरात मिरचीची लागवड केली. दीड एकर जागेवर मिरचीची लागवड करण्यासाठी नर्सरीत तयार झालेली साडेसात हजार रोपटे सव्वा रुपये नगाप्रमाणे विकत आणली. दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवून योग्य मशागत केल्याने शेतातील मिरची चांगलीच बहरली. हिरव्या झाडांना चांगला फुलोरा आल्याने मिरच्याही चांगला लागल्या. या हिरव्या मिरच्यांची तोडणी न करता लाल मिरच्यांची तोडणी करून वाळवायला सुरुवात केली. पहिल्या तोडणीत १८ क्विंटल वाळलेल्या मिरचीचे उत्पादन झाले असून अजून आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. आजच्या बाजारभावानुसार पाच लाखांचे उत्पादन अपेक्षित असून रोपटे, लागवड आणि पीक व्यवस्थापन यावर साधारत: दीड लाखांचा खर्चवजा जाता साडेतीन लाखांचा निव्वळ नफा राहणार आहे, असेही या शेतकरी महिलेने लोकमतशी बोलताना सांगितले.  

मिरचीच्या लागवडीसह व्यवस्थापना करिता प्रवीण डडमल यांचे मार्गदर्शन लाभले. देवळी तालुक्यात शेतकरी अद्रक, हळद, धणे आणि मिरची असे नवनवीन पीक लावून त्यातून चांगले उत्पन्न घेत आहे. परंपरागत पिकांसोबतच प्रयोगात्मक शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक संकटातून सुटका होऊन समृद्धीस हातभार लागेल.नीता मनोज वसू, शेतकरी महिला

 

टॅग्स :agricultureशेती