शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

वर्धा जिल्ह्यातील लोणीच्या १४ महिलांनी सुरू केले बल्बचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:03 IST

केवळ एका महिन्यात दोन लाख रुपये किमतीच्या उत्पादनाची विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित करतात. ही किमया वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील लोणी या केवळ ११०० लोकवस्ती असलेल्या गावातील महिलांनी करून दाखविली.

ठळक मुद्देनिर्मिती सुरू होताच ब्रँड नेमने विक्री करणारा पहिला समूहमहिला बचत गटाचे राज्यातील पहिले ब्रँड राज्यातील कुठल्याही महिला बचत गटाने उत्पादन सुरू केल्यानंतर त्या उत्पादनाला ब्रँड म्हणून ओळख मिळवून देण्याचा हा पहिला प्रयोग ठरला. प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाने निर्माण केलेल्या एलईडी बल्बची ओळख या पूरक या नावाने आ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २२ महिला बचत गटातील महिला एकत्र येतात. उद्योगाचा पाया रचतात. आकलनाबाहेर असलेल्या क्षेत्रात निर्मिती उद्योग उभारतात आणि गावातील या महिलांची मेहनत आणि महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानचे पाठबळ यामुळे हे शक्य होऊ शकले. याच महत्त्वकांक्षी महिलांची ही यशोगाथा.लोणी या गावात प्रिया सुनारकर आणि शुभांगी कोल्हे यांच्या नेतृत्वातील प्रज्ञा ग्रामसंघ आणि आशा ग्रामसंघ स्थापन केला. एका ग्रामसंघात ११ महिला बचत गटांचा समावेश असतो. या दोन्ही ग्रामसंघांनी एकत्र येऊन प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाची स्थापना केली. २२ महिला बचत गटातील १४ निवडक महिलांचा समावेश असलेल्या या उद्योगिनी संघाला महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानचे ग्रामपरिवर्तक अतुल राऊत यांनी दिशा दाखविली. उद्योग सुरू करणाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संघाने निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरविले. आता उद्योगाच्या दिशेने संघाचा प्रवास सुरू झाला.प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाच्या बैठकीत एलईडी बल्ब निर्मितीचा उद्योग सुरू करण्याचे ठरले. सर्व महिलांनी मिळून ९० हजार रुपये प्राथमिक रक्कम उभी केली. महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या निधीतून त्यांना ७० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. यातून एलईडी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू झाला आणि दीड महिन्यातच ३५ हजारांच्या नफ्यासह उद्योगाने भरारी घेतली.

दीड महिन्यांत ३५ हजारांचा नफाएक लाख ६० हजारांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांनी एक लाख ८५ हजारांच्या एलईडी बल्बची विक्री केली. आता सुमारे एक हजार बल्ब विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १२ स्ट्रीट एलईडी लाईटचीही निर्मिती केली. त्यांची विक्री झाली. जिल्हाधिकारी कार्यालतातर्फे तयार करण्यात आलेल्या रुरल मॉलला १ लाख २० हजार रुपयांच्या, उमेद वस्तू विक्री केंद्राला २५ हजारांच्या, दोन ग्रामपंचायतींना ३० हजारांच्या तर स्थानिक बाजारात २० हजार रुपयांच्या बल्बची विक्री प्रज्ञाशा संघाने केली असून त्यातून ३५ हजारांचा निव्वळ नफा कमावला.

काय आहे महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनमहाराष्ट्रातील विविध कॉपोर्रेट कंपन्यांच्या सहकार्याने सीएसआर फंडातून ग्रामीण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सुरू केलेले अभियान म्हणजेच महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन. या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील एक हजार गावांची निवड करण्यात आली आहे. एका ग्रामपंचायतीमागे एक मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमण्यात आला असून फाऊंडेशन आणि गावकरी यांच्यामधील सेतूचे कार्य तो करीत आहे. त्यांच्या सामाजिक विकासासाठी आवश्यक त्या योजना फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी कटिबद्ध आहे. निवड करण्यात आलेल्या गावात शैक्षणिक विकास, जलसमृद्धी, पर्यावरण सुरक्षा, शेतीविकास, आरोग्य सुरक्षा, डिजीटल कनेक्टिव्हिटी आदींवर भर देण्यात येत आहे. सुमारे १५० ग्रामपरिवर्तक (मुख्यमंत्री मित्र) यासाठी रात्रंदिवस गावकऱ्यांमध्ये मिसळून काम करीत आहे. अनेक गावात काही महिन्यातच सकारात्मक बदल दिसत असून ग्रामपरिवर्तनाची ही नांदी आहे.- रामनाथ सुब्रमण्यम,सीईओ, महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास