शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजयंती सप्ताहाच्या समारोपाला निघणार १५१ सायकलस्वारांची यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:55 IST

Mahatma Gandhi Wardha News महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहाचा समारोप १० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता सेवाग्राम आश्रम येथे १५१ सायकलस्वारांच्या सायकलयात्रेने होणार आहे.

ठळक मुद्दे‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानगावोगावी करणार जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहाचा समारोप १० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता सेवाग्राम आश्रम येथे १५१ सायकलस्वारांच्या सायकलयात्रेने होणार आहे. या यात्रेत जिल्हाभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ मोहिमेविषयी जनजागृती आरोग्य तपासणी व आरोग्य संदेशाद्वारे करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

जिल्ह्यातील १० नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात १५१ सायकलस्वारांची सायकल रॅली तसेच चित्ररथाद्वारे शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करणार आहे. यादरम्यान रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होऊन नागरिकांना प्रत्यक्ष कोरोना विषाणू आजाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देतील. तसेच चित्ररथाद्वारे ऑडिओ संदेशाच्या स्वरूपात मार्गदर्शनासोबत वैद्यकीय अधिकारी नागरिकांची तपासणी करणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन व्हावे यासाठी रॅलीमध्ये उपस्थितांचा विचार करून शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने वर्धा शहरासाठी चार पथके तयार करण्यात आली असून पथक क्रमांक एक सेवाग्राम आश्रम येथून निघणार आहे. रॅलीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या व तिसºया पथकातील रॅलीचा प्रारंभ बजाज चौक व चौथ्या पथकातील रॅलीचा प्रारंभ महात्मा गांधी चौक येथून करण्यात येणार आहे. रॅली विविध मार्गाने क्रमण करुन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ तसेच महात्मा गांधींचा संदेश आणि महात्मा गांधींच्या विचारांबाबत जनजागृती करणार आहे.

गांधीजयंती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचाही सहभाग राहणार आहे. रॅलीदरम्यान वैद्यकीय पथक नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, अस्थमा, मधुमेह, किडनी यासारखे आजार असल्याची तपासणी करून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करतील. सायकल रॅलीमध्ये सहभागी व्यक्ती ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असलेले टी-शर्ट व टोपी परिधान करून नगरपालिका, नगर पंचायत व शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत परिसरात जनजागृती करणार आहे. तपासणीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे.- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी