शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संवाद यात्रेने जाणून घेतल्या नऊ गावांतील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:38 IST

शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या.

ठळक मुद्देसिंदखेडराजा ते सेवाग्राम प्रवास : निवेदने स्वीकारून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या. वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान, शेतात सिंगल फेज वीज पुरवठा, गावपांदण रस्त्याची दुरूस्ती, शेतमालाला योग्यभाव, अनियमित वीज पुरवठा व सिंचनाच्या अपुºया सुविधा या समस्यांचा समावेश होता. याबाबत लेखी निवेदने स्वीकारून शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची हमी संवाद यात्रेचे प्रमुख आयोजक अभिजीत फाळके यांनी दिली.भूमिपुत्र संघर्ष वाहिनी पुणे, आपुलकी सामाजिक संस्था पुणे, श्री संत गाडगेबाबा चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई, किसानपुत्र सामाजिक संस्था, अनिल गावंडे मित्रपरिवार आणि टिचवन या सहा सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ ९ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथून झाला. मॉ जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा निघाली. अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती व वर्र्धा या पाच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ६० गावांना भेटी देत ग्रामस्थ व शेतकºयांच्या समस्या जाणून घेत शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हा यात्रेच्या आयोजनामागील हेतू होता. प्रत्येक गावात जाऊन शेतकºयांसोबत बसून समस्या जाणून घेतल्या. यात्रे दरम्यान गावांत हारतुरे न स्वीकारता, लाऊड स्पीकरचा वापर न करता, बॅनर वा पोस्टर न लावता तथा भाषणबाजी न करता शेतकºयांची थेट चर्चा केली. यात लेखी समस्या जाणून घेतल्या.कारंजा तालुक्यात संवाद यात्रेने शनिवारी जंगलाला लागून असलेल्या माळेगाव (काळी), नरसिंगपूर, उमरी, ब्राह्मणवाडा, ठाणेगाव या गावांना भेटी दिल्या. सभोवतालच्या गावांतील समस्याही जाणून घेण्यात आल्या. सरपंच, गावस्तरीय कार्यकर्ते, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेसोबत आपूलकी व भूमीपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके, संत गाडगेबाबा संस्थानचे प्रशांत देशमुख, योगेश देशमुख, अनिल गावंडे, संतोष अडसर, गजानन बोरोकार, सागर देशमुख, मिथून मोंढे, निखिल जैत, विजय घाळाय, प्रदीप बिल्लोरे, तसेच वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ते सचिन घोडे, प्रशांत देशमुख, सागर बरडे, नंदू गावंडे, संदीप शेळके, राजाभाऊ पालीवाल, प्रा. अरुण फाळके, भाऊराव धोटे, भांगे, कामटकर, पांडे, भक्ते, जोरे, अवथळे, नासरे, देवासे उपस्थित होते. त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधून निवेदने स्वीकारली. उच्च शिक्षित नोकरी असलेले युवक शेतकºयांपर्यंत पोहोचल्याने हवालदिल शेतकºयांना दिलासा मिळाला.या समस्यांचा होणार पाठपुरावातालुक्यात एखादे मोठे धरण व्हावे, पाझर तलावांची खोली वाढवावी, दुरूस्ती करावी, खैरी धरणाची पाणी साठवणूक व सिंचन क्षमतेसाठी धरणाची उंची वाढवावी, मोर्शी, खरसखांडा, नरसिंगपूर, बोंदरठाणा येथे नवीन तलावांची निर्मिती करावी, प्रत्येक गावातील पांदण रस्ते दुरूस्त करावे, शेतात सिंगल फेज वीज द्यावी, विद्युत पुरवठा १२ तास द्यावा, ब्राह्मणवाडा, माळेगाव, नरसिंगपूर या गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरू करावे, हेटीकुंडी पशुपैदास केंद्राचे पुनरूज्जीवन करावे, उमरीचा शिकस्त झालेला पाझर तलाव दुरूस्त करावा, आदी समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार संवाद यात्रेमार्फत व्यक्त करण्यात आला.