शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या लोकसंख्येने समस्येत भर

By admin | Updated: July 15, 2014 00:10 IST

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे आर्थिक, सामाजिक समस्यात वाढ होऊन पर्यावरण विषयक असंतुलन झाले आहे. यामुळे अनेक समस्यांना देशाला तोंड द्यावे लागते. लोकसंख्या

वर्धा : देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे आर्थिक, सामाजिक समस्यात वाढ होऊन पर्यावरण विषयक असंतुलन झाले आहे. यामुळे अनेक समस्यांना देशाला तोंड द्यावे लागते. लोकसंख्या नियंत्रणाकरिता जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांनी केले.जिल्हा परिषद सभागृहात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित आनंदीबाई पुरस्कार योजनेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी आरोग्य समिती सभापती प्रा. उषाकिरण थुटे, महिला बालकल्याण सभापती निर्मला बिजवे, समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलींद सोनोने, डॉ. अजय डवले, धैर्यशील जगताप, मनोज चांदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर बोलताना थुटे म्हणाल्या, देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे कृषीविषयक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे बेरोजगारी व गुन्हेगारी यात वाढ झाली आहे. तसेच डॉ. चव्हाण यांनी जिल्ह्याने कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळेच या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांपासून अन्य कर्मचारी पे्ररणा घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेत उत्कृष्ठ कार्य केल्याबाबत ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा(मो.), साहूर, गौळ, आरोग्य उपकेंद्र पेठ, बेढोणा, जऊरवाडा तसेच ७८ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आरोग्य मित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी एका मुलीवर शस्त्रक्रिया करवुन घेणाऱ्या दांपत्यांचा साडी, चोळी व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामीण रुग्णालय, पुलगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल नारलवार, डॉ. भागवत राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राजीव देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. अजय डवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)