शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामात रस्त्यासह सौंदर्यीकरणाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 22:01 IST

सिंदी नगर पालिकेला शासनाकडून मंजूर झालेल्या १० कोटीच्या विशेष निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह सौदर्यीकरणाची कामे करण्याची मागणी....

ठळक मुद्देमागणी : आमदारांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : सिंदी नगर पालिकेला शासनाकडून मंजूर झालेल्या १० कोटीच्या विशेष निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह सौदर्यीकरणाची कामे करण्याची मागणी विविध पक्षाच्या व संघटनेच्यावतीने आमदार समीर कुणावार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सिंदी शहराच्या विकासाकरिता आमदार समीर कुणावार यांनी नगर परिषदेत सत्ता नसताना कोटींचा विशेष निधी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी मंजूर करून घेतला आहे. त्यात गावातील रस्ते व नाली बांधकाम व बाजार चौक सौंदर्यीकरण आदी कामे घेण्यात आली होती. या निधीतून गावातील अनेक विकास कामे अपेक्षीत होते. पण, मुख्य हेतुला डावलल्या जात आहे. शहर विकासासाठी प्राप्त झालेल्या १० कोटींच्या विशेष निधीतून शहराकरीता मैदाने, बगीचे, टाऊन हॉल (सांस्कृतिक हॉल), अभ्यासिका, माता मंदिर ते मांगली रोडपर्यंत उडाण पुल, बॅडमिंटन खेळण्याकरिता उडणकोट, हायमास्क, बस स्टॅण्ड पिपरा नालापर्यंत सिमेंट रस्ता आदी कामे करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अमोल सोनटक्के, आशिष देवतळे, आनंद छाजेड आदींची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नागरिकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आ. कुणावर यांनी दिले.