शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:55 IST

विदर्भातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान पार पडले. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळताना दिसून आले.

ठळक मुद्दे३० ते ४० टक्क्यांनी वाढ : गृहिणींचे अर्थकारण बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान पार पडले. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळताना दिसून आले. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडले.मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये, ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महाग होऊन २८ ते ११२ रुपयांपर्यंत विक्री होत आहे.गव्हाची मध्य प्रदेश आणि राजस्थानातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हाच्या भावावर जास्त परिणाम दिसून आला नाही. बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची सातत्याने दरवाढ सुरूच आहे. पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचेही भाव कडाडले आहे. टमाटर, वांगी वगळता सर्वच भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. डाळींचा वापर करावा, त्याही महागल्याने गृहिणींचे अर्थकारण कोलमडले आहे. दरवाढ नियंत्रणात आणेल कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.