शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दारू तस्करी रोखणे बेततेय पोलिसांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:28 IST

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. यावर आळा घालण्याकरिता पोलिसांकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत आहे.

ठळक मुद्देठाणेदार गंभीर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर अपघात

ऑनलाईन लोकमत समुद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. यावर आळा घालण्याकरिता पोलिसांकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत आहे. यातच अवैध दारूची तस्करी रोखण्याकरिता खासगी वाहनांचा वापर सध्या वाढला आहे. अशाच खासगी वाहनातून दारूची तस्करी करणाºया वाहनाचा पाठलाग करताना समुद्रपूर येथील ठाणेदार प्रवीण मुंडे यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.नागपूर-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूरकडे अवैधरित्या वाहनात दारूची वाहतूक होत आहे. हे कळताच ठाणेदार प्रविण मुंडे यांनी स्वमालकीच्या एमएच ३१ एफए ४१३६ क्रमांकाच्या वाहनाने समुद्रपूर-जाम मार्गाने निघाले. दरम्यान, ३३ केव्ही जवळ त्यांची गाडी रस्त्यावरील गिट्टीवरुन उसळत सरळ बाजूला असलेल्या खोल नालीत जाऊन धडकली. यात त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. मागाहून येत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रविण लिंगाडे यांच्या निर्दशनास हा अपघात येताच त्यांनी ठाणेदार मुंडे यांना वाहनातून बाहेर काढून उपचाराकरिता समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या अपघातामुळे दारूची अवैध वाहतूक करणाºया वाहनास पसार होण्यास मोकळा मार्ग मिळाला. चंद्रपूर जिल्हा दारुबंदी झाल्यापासून या मार्गे अवैध दारू वाहतूक वाढली आहे. या वाहतुकीला आळा घालणे पोलिसांच्या जीवावर बेतत आहे.गतीकरिता खासगी वाहनांचा वापरदारूची तस्करी करणाºयांकडे आधुनिक वाहने आहेत. ती १२० ते १५० च्या स्पीडने धावतात तर पोलिसांकडील वाहने ८० च्या वर जात नाही. यामुळे पोलिसांना खासगी वाहने वापरावी लागत आहेत. यात आर्थिकदृष्ट्या सधन असलेले कर्मचारी स्वमालकीची वाहने वापरताना दिसतात. काही कर्मचारी कुण्या सहकाºयांकडून ‘स्पॉन्सरशीप’ घेऊन वाहने घेत असल्याचे समोर आले आहे. काही भागात ही ‘स्पॉन्सरशीप’च दारू विक्रेत्यांकरिता मार्ग मोकळा करून देणारी ठरत आहे.