शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पत्रकार परिषद : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती

By admin | Updated: June 28, 2017 00:56 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलीस शाखा प्रयत्नरत आहे. वाहन धारकांना शिस्त लागावी म्हणून

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलीस शाखा प्रयत्नरत आहे. वाहन धारकांना शिस्त लागावी म्हणून उपाययोजना केल्या जात असून दंडात्मक कारवाईही केली जात आहे. २६ दिवसांत शहरात ३ हजार ७२५ प्रकरणांत ४ लाख ७२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय पार्किंग, सिग्नल व्यवस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा व कारवाईबाबत माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पूढे म्हणाल्या की, बजाज चौक, आर्वी नाका येथे सुयोग्यरित्या ड्रम बॅरीकेटींग केले आहे. शहरात पोलीस दलामार्फत महत्त्वाच्या सर्व चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या यंत्रणेमार्फत महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यात येत आहे. सराफा व बाजार लाईनमध्ये पी-१, पी-२ पार्कींग व्यवस्था केली आहे. पिवळे पट्टे मारले आहे. पार्कींगचे उल्लंघन केल्या प्रकरणी पाच दिवसांत १८५ वाहन चालकांवर कारवाई करून २७ हजार ७५० रुपये दंड वसूल केला. डॉ. आंबेडकर चौकात बॅरीकेटींग करून राँग साईडने येणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू आहे. पाच दिवसांत ८०० केसस नोंद करीत ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महत्त्वाच्या चौकांत चौक्या उभारून वाहतूक नियमन करणार आहे. सिंदी मार्केटमधील अतिक्रमण न.प. च्या साह्याने हटवून टूव्हीलर पार्कींग तर शहर ठाण्याजवळ फोर व्हीलर पार्कींग व्यवस्था केल्याचेही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, वाहतूक पोलीस शाखेचे दत्तात्रय गुरव आदी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक सिग्नल लागणार बजाज चौक, आर्वी नाका, शिवाजी चौक येथे इलेक्ट्रॉनिक सिग्नल व्यवस्था सुरू करण्याबाबत पालिकेला वाहतूक शानेने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. दोन महिन्यांत इलेक्ट्रॉनिक सिग्नल सुरू होणार आहे. वर्र्धा शहरात अवजड वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात आलेली आहे. मार्केट परिसरातही काही मार्ग एकेरी करण्यात आले आहेत.