लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये शनिवारी पहाटे व्यायाम करीत असताना आलेल्या ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.दि.२२ रोजी सेवाग्राम येथील सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा सर्वोदयाशी निकटचा संबंध होता. निसर्गोपचाराचा त्यांचा व्यासंग व अनुभव दांडगा होता.आज त्यांच्या आकस्मिक निधनाने संमेलनात शोककळा पसरली एक चांगला कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन यात्री निवास ते संमेलन स्थळ अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. संजय बेहरे यांनी सूतमाळ व खादीची शाल त्याना अर्पण केली. सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी जयवंत मठकर, महादेव विद्रोही, श्रीराम जाधव, शिवचरण ठाकूर, शेख हुसेन, चंदन पाल, हरिभाऊ वेरूळकर, बाबाराव खैरकार इ.सह सर्वोदय कार्यकर्तै उपस्थित होते.आज त्यांच्या पार्थिवावर गडचिरोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे आकस्मिक निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:55 IST
गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये शनिवारी पहाटे व्यायाम करीत असताना आलेल्या ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.
गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे आकस्मिक निधन
ठळक मुद्देसेवाग्राम येथे संमेलनस्थळी झाले निधन