शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

कीटकजन्य आजारांवर प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:04 IST

हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा महिनाभर राबविणार जागृतीपर उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना जाहीर करीत सदर महिन्यात विविध उपक्रम हाती घेवून नागरिकांमध्ये कोरडा दिवस पाळणे आदी विषया संदर्भात प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे.हिवताप, डेंग्यु, चिकणगुनिया, चंडीपूरा व हत्तीरोग आदी किटकजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण होऊन त्यांच्या प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टिने जून महिन्यात गाव पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाययोजना यांची माहिती तज्ज्ञ व्यक्ती नागरिकांना देणार आहेत. डासोत्पत्ती टाळणे, प्रतिरोध उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे हा महिनाभर राबविण्यात येणाºया हिवताप प्रतिरोध उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या आजारांच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी व लोकसंख्येतील जंतुभार कमी करण्यासाठी, उपचार तसेच डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती होऊ न देणे, याची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी भागांमध्ये या आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी किटकजन्य आजार हिवताप प्रतिरोध महिना जुन मध्ये राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून नागरिकांनीही यात सहभागी होत आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने, जि.प.च्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले आहे.नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचेकोणतीही आरोग्याबाबतची योजना जनतेच्या सक्रीय सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. रुग्ण शोध मोहीम तसेच डासांवर नियंत्रणासाठी जनतेच्या सहभागाला महत्त्व प्राप्त आहे. म्हणून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किटकजन्य कार्यक्रमास सहकार्य करावे. तसेच दक्ष राहून डासांपासून प्रसार होणाºया आजारावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला मदत करावी, असे कळविण्यात आले आहे.गावागावात तज्ज्ञ करणार मार्गदर्शनकुठल्याही गोष्टीची जनजागृती ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. नागरिकांनीही यात सहभागी होत उपक्रम यशस्वी करणे गरजचे आहे. किटकजन्य आजार प्रतिरोध मोहीम ही शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व कार्यक्षेत्रात येणाºया उपकेंद्र व त्याअंतर्गत गावपातळीपर्यंत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान तज्ज्ञ मंडळी नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.प्रतिबंधात्मक उपायांची देणारमाहितीसदर मोहिमेत अतिसंवेदनशील गावात ग्रामसभा घेवून तेथील रहिवाशांना किटकजन्य आजार कशापासून होते. त्याचा प्रसार कशा पासून होतो, आजाराची लक्षणे कुठली, उपचाराची उपलब्धता, प्रभावी किटकनाशकांची फवारणी, मच्छरदाणीचा वापर, शोष खड्डयांची निर्मिती, व्हेंट पाईपला जाळ्या बसविने व डासअळी तयार होऊ नये याबाबतची माहिती जनतेला देण्यात येणार आहे.कोरड्या दिवसाचे पटवून देणार विद्यार्थ्यांना महत्त्वगावत सदर आजाराविषयी दवंडी, दिंडया व गटसभा माध्यमाने प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना कोरडा दिवस म्हणजे काय व त्याचे फायदे याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात येणार आहे.