शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अन् विमान प्रवासाने भारावला प्रणव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:34 IST

पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यां सारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहचलो. विमानतळ पाहुन व इतक्या कमी वयात विमानाच्या प्रवासाने आपण अक्षरश: भारावलो आहे.

ठळक मुद्देलोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : दिल्लीत उपराष्ट्रपतींची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यां सारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहचलो. विमानतळ पाहुन व इतक्या कमी वयात विमानाच्या प्रवासाने आपण अक्षरश: भारावलो आहे. हे सर्व लोकमतमुळे शक्य झाल्याचे प्रणव काळे याने सांगितले.प्रणव काळे या विद्यार्थ्यांची लोकमत समुहातर्फे संस्काराचे मोती स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर प्रणव काळे या विद्यार्थ्यांने प्रवासाचे वर्णन कथन केले. मंगळवारला परत आल्यानंतर गुरुवारला सकाळी आर्वी येथील विद्या निकेतन शाळेचा प्रणव काळे यांचा लोकमत कार्यालयातर्फे आर्वी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी प्रणव काळे यांची आई वर्षा विठ्ठराव काळे, विद्या निकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा वडणारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आर्थिक स्थिती सर्वसाधारण असलेला हा परिवार लोकमतच्या या उपक्रमामुळे सध्या आनंदमय् वातावरणात असल्याचे प्रणवच्या आजी-आजोबांनी केला. लोकमत अश्याच उपक्रमामुळे लोकप्रिय असून महाराष्ट्रातील नंबर १ चे वृत्तपत्र असल्याचे प्रणवच्या आई-वडिलांनी यावेळी सांगितले. अनेकांचे आयुष्य संपते; पण त्यांना विमानातून प्रवास करायला मिळत नाही. प्रणवला मात्र लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफर करायला मिळाला. यामुळे आम्ही धन्य झालो. लोकमतचे कितीही कौतुक करावे. गरीब परिवारातील मुलांना लोकमतच्या अशा नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून हवाई प्रवासा तसेच उपराष्ट्रपतींसह अन्य मान्यवरांची भेट घेता आली. हे आयुष्यातील कधी न विसरणारे क्षण असल्याचे प्रणव व त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

टॅग्स :Lokmatलोकमत