देवळी : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅ. के्रडीट सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी आणि त्यांच्या १३ सहकारी संचालक मंडळावर स्थानिक पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला़ महाराष्ट्र ठेवीदाराच्या हिसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत कलम ३ व ४०६, ४२० अधिक ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती ठाणेदार गजानन वासेकर यांनी दिली. बीएचआर बँकेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह मधुकर सानप, दिलीप चोरडीया, सुरज जैन, दादा पाटील, भागवत माळी, मोतीलाल गिरी, राजाराम कोळी, भगवान वाघ, डॉ. हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवानी, यशवंत गिरी, रमजान शेख व देवळी शाखा व्यवस्थापक सर्व रा़ जळगाव यांचा यात समावेश आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅपरिटीव्ह क्रेडीट सोसायटीने अधिक व्याजाचे प्रलोभन दिल्याने मोठ्या प्रमाणात ठेवीदारांनी आपल्या ठेवी या संस्थेत ठेवल्या. मुदत संपल्यावर मागणी करूनही ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने ग्राहकांनी पोलिसांत धाव घेत तक्रारी नोंदविल्या़ देवळी शाखेत सुमारे दीड कोटीच्या ठेवी आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दयानंद काणे यांच्या नेतृत्वात ५३ ठेवीदारांनी लेखी स्वरूपात तक्रारी नोंदविल्या़ पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी राजन पाली यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन वासेकर यांनी गुन्हा नोंदवून कार्यवाही सुरू केली आहे. पूढील तपास हे.कॉ. सतीश वघाळे करीत आहे़(प्रतिनिधी)
प्रमोद रायसोनी व संचालक मंडळावर गुन्हा दाखल
By admin | Updated: February 3, 2015 23:00 IST