शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

बंदीजनांच्या जीवनात प्रकाशदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हातून कळत नकळत गुन्हे घडतात. यात काही गुन्हे गंभीर तर काही साधारण आहेत. यात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना शिक्षा संपल्यानंतर समाजात मानाने जगता यावे याकरिता येथील महात्मा गांधी औद्योगिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या बंदीजणांच्या माध्यमातून निर्माण झालेले दिवे बाजारातून अनेकांच्या ...

ठळक मुद्देजिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून मिळाला २.९३ लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हातून कळत नकळत गुन्हे घडतात. यात काही गुन्हे गंभीर तर काही साधारण आहेत. यात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना शिक्षा संपल्यानंतर समाजात मानाने जगता यावे याकरिता येथील महात्मा गांधी औद्योगिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या बंदीजणांच्या माध्यमातून निर्माण झालेले दिवे बाजारातून अनेकांच्या घरातील अंधार दूर करण्याकरिता महत्त्वाचे ठरणार असून बंदिजणांच्या जीवनात प्रकाश देणारेच ठरणार आहे.वर्धा कारागृहातील बंदिस्त १२ कैद्यांना महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेच्यावतीने १५ दिवसांचे एल.ई.डी. दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेमधून कौशल्य विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. २ लक्ष ९३ हजार रुपयांमधून यासाठीचा कच्चा माल व साहित्य खरेदी करून कैद्यांनी विविध वॅटचे १५० दिवे बनविले.बाजारात उपलब्ध दिव्यांमध्ये प्लास्टिकचे वेष्टन असलेले दिवे आहेत. बंद्यांनी बनवलेले दिवे हे अल्युमिनिअम वेष्टनात बनविले असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे; मात्र हे दिवे ५ वर्ष टिकणारे असून ५० हजार तास अविरत चालू शकतात. तसेच बिघडलेले किंवा मर्यादा संपलेले दिवे लाईट, सोलर दिवे यांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी कारागृहात भेट देवून प्रशिक्षण प्रकल्पाची पाहणी करून मी बंदीजणांशी संवाद साधला. यावेळी एमगिरीचे व्यवस्थापक प्रफुल्ल काळे, जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एमगिरीचे अधिकारी रविकुमार, एस.पी. वाघाडे यांच्यासह कारागृहाचे अधिकारी उपस्थित होते.बंदी बांधवांनी सोलर कृषी पंपही बनवावे - शैलेश नवालबाजारपेठेत असलेल्या कमी किमतीच्या दिव्यांशी स्पर्धा करण्याकरिता प्लास्टिक वेष्टन असलेले कमी किमतीचे दिवे सुद्धा तयार करावेत. आता बनविलेले दिवे सुद्धा विक्रीसाठी ठेवावेत. ग्राहकांना स्वताच दोन्ही दिव्यांची चाचणी घेतल्यानंतर ग्राहकांना जास्त दिवस चालणाºया दिव्यांविषयी खात्री पटवून याला जास्त ग्राहक मिळतील. बंद्यांनी ५ किलो वॅटचे सोलर पंप बनवावे. यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात सोलर पंप उपलब्ध होतील. आशा प्रकल्पामुळे कैद्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर या प्रशिक्षणामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी आशा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी व्यक्त केली.