शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. सभापती पदासाठी खलबते सुरू; सदस्य वारीला

By admin | Updated: March 12, 2017 00:40 IST

स्थानिक पं.स. सभापतीची निवड १४ मार्च रोजी होणार आहे. येथे भाजपकडे ७, काँग्रेस ३, राष्ट्रवादी २,

हिंगणघाट/अल्लीपूर : स्थानिक पं.स. सभापतीची निवड १४ मार्च रोजी होणार आहे. येथे भाजपकडे ७, काँग्रेस ३, राष्ट्रवादी २, सेना १ व इतर १ असे संख्याबळ आहे. सभापती पदासाठी सध्या खलबतं सुरू असून सदस्य मात्र वारीला गेल्याचे कळते. भाजपला बहुमतासाठी केवळ एका सदस्याची गरज आहे. भाजपाच्या गळाला कोण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे प्रशांत चंदनखेडे अल्लीपूर, विजय पर्बत फुकटा, गंगाधर कोल्हे पोहणा, वंदना मडावी पिपरी, वैशाली पुरके नांदगाव, छाया बोरकर वाघोली व धनंजय रिठे, आजंती हे सदस्य असून ते वारीवर गेले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एक सदस्य हेरण्याचा प्रयत्न करीत असून अद्याप कुणाशी बोलणी झाल्याची माहिती नाही; पण वेळेपर्यंत सर्वच मंगल होईल, अशी पक्षाला आशा आहे. भाजपचे सभापती पदाचे उमेदवार हे १ मताने पराभूत झाले. यामुळे पक्षाचे तसेच वैयक्तिक प्रफुल बाडे यांचे स्वप्न भंग झाल्याने ‘गड आला; पण सिंह गेला’, अशी स्थिती आहे. बाडे विजयी झाले असते तर सभापती पदाचे चित्र स्पष्ट असते. सध्या सभापती पदाची माळ आजनसरा येथील विजय पर्बत यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे; पण ते वेळच ठरवेल. याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. अद्याप कुणासोबत चर्चा झाली नाही; पण वेळेपर्यंत एक सदस्य मिळेल, असे सांगितले.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)