लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याकरिता प्रशासन उपाययोजना करीत असतानाच कर्मचारी त्याला छेद देण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या पुलगाव येथील व्यक्तीचा मृतदेह सेवाग्राम कोविड रुग्णालयातून मोक्षधामात अंत्यसंस्काराकरिता आणण्यात आला.अंत्यसंस्कारानंतर आरोग्य कर्मचाºयाने पीपीई किट तेथेच फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.यापूर्वी नालवाडी परिसरात रुग्णालयातील साहित्य व पीपीई किट फेकल्याचा प्रकार उजेडात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मोक्षधामातील या प्रकरणात सेवाग्राम रुग्णालय प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
मोक्षधामातच फेकली पीपीई किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST
अंत्यसंस्कारानंतर आरोग्य कर्मचाºयाने पीपीई किट तेथेच फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी नालवाडी परिसरात रुग्णालयातील साहित्य व पीपीई किट फेकल्याचा प्रकार उजेडात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
मोक्षधामातच फेकली पीपीई किट
ठळक मुद्देरुग्णालयातील कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा