शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:16 IST

महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे. यामुळे पिकांच्या सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शिवसेना, शेतकºयांनी केली. याबाबत बुधवारी महावितरणचे अभियंता सदावर्ते यांना निवेदन देण्यात आले.शिवसेना तालुका प्रमुख गणेश इखार व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांच्या ओलित व अन्य समस्या लक्षात घेत महावितरणला निवेदन देण्यात आले. ऐन थंडीच्या दिवसात रात्री ११ वाजता वीज पुरवठा सुरू होत असल्याने ओलित करताना अनेक संकटांना समोर जावे लागत आहे. अनेक शेतकºयांची प्रकृती खालावली असून जंगली जनावरे तथा विषारी साप, विंचू आदी प्राण्यांपासून शेतकरी व शेतमजुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत शेतातील वीज पुरवठा असलेले वेळापत्रक तीन दिवस सकाळी व चार दिवस सायंकाळी, असे आहे. हे वेळापत्रक शेतकºयांकरिता योग्य नसून अडचणीत आणखी भर टाकणारे आहे. यामुळे तूर, गहू, चना, कापूस आदी नगदी पिके घेता येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या समस्या लक्षात घेत वेळापत्रकात योग्य तो बदल करावा व दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिवसेना, शेतकºयांनी रोषही व्यक्त केला.निवेदन देताना प्रकाश खेकडे, निलेश वैद्य, श्याम शेंडे, सचिन पाटील, गजानन झाडे, विनोद आदमने, दिलीप राऊत, विनायक राऊत, सुरेश नन्नुरे, प्रशांत वैद्य, गजानन नन्नुरे, प्रमोद नागतोडे, बाबाराव खेकडे, धनंजय पाटील, मारोतराव नन्नुरे, विजय काकरवाल, रमेश काकरवाल, रमेश नाईक, सुरेश पंधराम, संदीप ठाकरे, पप्पू नाईक, अमोल भोयर, पांडुरंग उईके, श्याम नन्नुरे, गुलाब सिंग, सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.