शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा विश्वास हीच पोलिसांची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:35 IST

समाजात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे. आज आपल्याला एकमेकांचा विश्वास संपादन करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत मदने : पोलीस मित्र संघटनेचा संवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे. आज आपल्याला एकमेकांचा विश्वास संपादन करण्याची वेळ आली आहे. विश्वासातून माणसे जवळ येतात. नागरिकांमध्ये पोलिसांबाबत असलेला विश्वास हीच पोलिसांची खरी शक्ती असून पोलीस व जनतेत सामंजस्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी केले.जिजामाता विद्यालयात दक्ष नागरिक फाऊंडेशन पोलीस मित्र संघटनेतर्फे विद्यार्थ्यांकरिता आयोजित जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.मंचावर रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय मगर, लॉयन्स क्लबचे वरिष्ठ संचालक अनिल नरेडी, प्राचार्य सोनटक्के, दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, उपाध्यक्ष इमरान राही, सचिव अंबादास जामुनकर, हरिष तांदळे, वासुदेव बोंदरे उपस्थित होते.पुढे बोलताना मदने म्हणाले, व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, मुलींची छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटनांत वाढ होताना दिसून आले. समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस असले तरी त्यांना नागरिकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगितले. ठाणेदार विजय मगर, प्राचार्य सोनटक्के, प्रकाश खंडार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करावे, असे आवाहन केले.संचालन वाघमारे यांनी केले. आभार मोहन राईकवार यांनी मानले. यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदींनी सहकार्य केले.