शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या हक्काचे रॉकेल चालले आॅटोरिक्षांमध्ये

By admin | Updated: September 9, 2016 02:23 IST

शहरातील काही आॅटोचालक पैसे वाचविण्यासाठी आॅटोमध्ये पेट्रोलसोबतच रॉकेल भरत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.

ग्राहकांवर अन्याय : रॉकेलच्या काळ्या धुरामुळे प्रदूषणातही वाढवर्धा : शहरातील काही आॅटोचालक पैसे वाचविण्यासाठी आॅटोमध्ये पेट्रोलसोबतच रॉकेल भरत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यातच वापरले जात असलेले हे रॉकेल गरिबांच्या हक्काचे आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनही याकडे साफ डोळेझाक करीत असल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे. शहरातील वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहावे, यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र काही आॅटोरिक्षाचालक प्रदूषण करीत शहराची वाट लावत आहेत. रस्त्यावरून रिक्षा सतत धूर सोडत जातात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाचालकांना श्वासोच्छवासाचा त्रास सहन करावा लागतो. आता तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांचे चालकही इंधनात रॉकेलचा वापर कराताना दिसत आहेत. ‘मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक’साठी बाहेर पडणाऱ्यांसोबतच सर्वांचेच आरोग्य या प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे.एकीकडे गरिबांना स्टोव्ह पेटविण्यासाठी रेशनवर रॉकेल मिळत नाही. आॅटोरिक्षाचालकांना मात्र इंधनात भेसळ करण्यासाठी रॉकेल सहज उपलब्ध होते. रेशनवर विकले जाणारे रॉकेल सर्वसामान्यांना दिले जात नसून, रिक्षावाल्यांना ब्लॅकने दुपटीच्या दराने विकले जात असल्याचा आरोप रेशन कार्डधारक करीत असतात. शहरात प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.