शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्यात जन्मलेला संजय भोगतोय अपंगत्वाच्या वेदना

By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST

आर्थिक परिस्थितीने माणूस गरीब वा श्रीमंत असला तरी तो आपली परिस्थिती बदलू शकतो; पण शारीरिक अपंगत्व आले तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील

सचिन देवतळे - विरूळ (आ़)आर्थिक परिस्थितीने माणूस गरीब वा श्रीमंत असला तरी तो आपली परिस्थिती बदलू शकतो; पण शारीरिक अपंगत्व आले तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील व्यक्तीला आले तर त्याला उपचार करणेही कठीण जाते. विरूळ येथील संजय दाभाडे हा युवकही असाच गरीबीचा शाप आणि अपंगत्वाचे ओझे घेऊन उपचारासाठी पै-पै गोळा करीत असल्याचे दिसते़अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या संजयची कहाणी विदारक आहे. संजय हा इतरांसारखाच सृदृढ व मेहनती तरूण होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला हा तरूण मेहनत करून आपले व आपल्या वृद्ध आई-वडिलांचे पोट भरत होता़ सततच्या आजारपणामुळे त्याच्या वृद्ध आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. यानंतर तो बहिणीच्या साह्याने जीवन जगत असताना बहिणीचाही मृत्यू झाला़ यामुळे बहिणीच्या दोन लहान मुलींची जबाबदारी त्याच्यावर आली़ ही जबाबदारी तो पेलत असतानाच नियतीने त्याची क्रूर थट्टा केली. संजय आजारी पडला आणि अपंगच झाला. त्याला आता उभे राहता येत नाही़ जमिनीवर घुसून त्याला पूढे जावे लागते़ शेजारील व्यक्ती त्याला उचलून इकडेचे तिकडे करतात़ जवळ होता तेवढा पैसा त्याने आपल्या आजारावर खर्च केला. शासनाच्या ६०० रुपयांवर तो दोन चिमुकल्यांसह जगत आहे़ यापूर्वी त्याच्यावर राजस्थान येथे शस्त्रक्रिया करण्यात आली़ पैसा खर्च झाला; पण अपंगत्व दूर झाले नाही. आता पुढील महिन्यात त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया आहे. यासाठी १० ते १५ हजार रुपयांची गरज आहे. पैशाची जुळवा-जुळव करण्यासाठी संजयची धडपड सुरू आहे.