शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

आजी-माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 30, 2015 02:38 IST

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शूरविरांच्या स्मृती कायम तेवत राहव्या म्हणून आष्टी तालुक्याची निर्मिती झाली. शासनाने आता नगर पंचायतीचा दर्जा दिला.

नगर पंचायत निवडणूक: निष्ठावंतांना डावल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी सुरेश बद्रे/अमोल सोटे आष्टी (शहीद)१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शूरविरांच्या स्मृती कायम तेवत राहव्या म्हणून आष्टी तालुक्याची निर्मिती झाली. शासनाने आता नगर पंचायतीचा दर्जा दिला. त्याची पहिलीवहिली निवडणूक १ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त असले तरी आजी-माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.एकूण १७ जागांसाठी तब्बल ७५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस १७, भाजपा १७, जनशक्ती पार्टी १२, शिवसेना ११, राष्ट्रवादी काँग्रेस ३, माकपा १, बसपा १, अपक्ष १३ असे उमेदवार आहे. या उमेदवारांचे भवितव्य ४ हजार ४१२ पुरुष व ४ हजार ५७ महिला अशा एकूण ८ हजार ४६९ मतदारांच्या हाती आहेत. मतदार संख्या कमी आणि वॉर्ड लहान असल्यामुळे ‘डोअर टु डोअर’ प्रचारावर सर्वच राजकीय पक्षांचा भर आहे. यावेळी निवडणुकीत विकासाचा मुद्दा प्रामुख्याने रेटला जात आहे. मतदार जागरूक झाला आहे. एकदा केलेले मतदान पाच वर्ष विकासाला महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. याची चर्चा मतदार करताना दिसून येते. यावेळी जुन्या फळीमधील कार्यकर्त्यांना तिकिट वाटपात डावलल्याने काँग्रेस पक्षांतर्गत नाराजीचा सूर आहे. काँग्रेसला याची सर्वाधिक झळ बसण्याची शक्यता आहे. बंडखोरांचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी आपल्या काँग्रेसच्या उमेदवारांसाठी चांगलीच कंबर कसली आहे. विकासाचा मुद्दा पुढे करुन ते मते मागत असले तरी बंडोबांचे आव्हान ते कसे पेलवतील, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रथमच जनशक्ती पार्टीने आपले उमेदवार उभे केले आहे. त्यांनीही प्रचारात चांगलीच मजल मारली आहे. जनशक्ती पार्टीच्या प्रचारात मकेश देशमुख व त्यांचे कार्यकर्ते भिडले आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने त्यांच्याही प्रचाराला चांगलीच गती आल्याचे दिसत आहे. उल्लेखनीय, त्यांच्याकडून उमेदवार कसा असावा, यावर प्रचाररुपी प्रबोधनच सुरू असल्याचे दिसून येते. शिवसेनेची धुरा निलेश देशमुख यांच्यावर आहे. भाजपाने यावेळी अत्यंत चौकसबुद्धीने उमेदवारी बहाल केल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार दादाराव केचे हे मागील दोन महिन्यांपासून मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठी करताना दिसून येत असून ते सध्या आष्टीत तळ ठोकून आहे. आष्टीला उभे केलेले ग्रामीण रूग्णालय, पंचायत समिती इमारत, अंतर्गत रस्ते तसेच पालकमंत्र्याकडून मंजूर करून घेतलेले पाच कोटी रूपये विकासासाठी कसे खर्ची लावणार हे मतदारांना पटवून देत मतांचा जोगवा मागत आहे. यात ते कितपत यशस्वी होतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. प्रत्येकजण विकासाच्या बाता करीत असले तरी मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतो, हे निकालानंतरच कळेल. चार वॉर्डात त्रिकोणी लढतप्रभाग १ मध्ये ४, प्रभाग २ मध्ये ६, प्रभाग ३ मध्ये ४, प्रभाग ४ मध्ये ४, प्रभाग ५ मध्ये ४, प्रभाग ६ मध्ये ५, प्रभाग ७ मध्ये ४, प्रभाग ८ मध्ये ४, प्रभाग ९ मध्ये ५, प्रभाग १० मध्ये ३, प्रभाग ११ मध्ये ३, प्रभाग १२ मध्ये ३, प्रभाग १३ मध्ये ७, प्रभाग १४ मध्ये ३, प्रभाग १५ मध्ये ५, प्रभाग १६ मध्ये ५ व प्रभाग १७ मध्ये ५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहे. यातील प्रभाग १०, ११, १२, १४ मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार असल्याने येथे त्रिकोणी लढतीचा, तर अन्य वॉर्डात बहुरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.