शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सणाला होणाऱ्यां ग्रामसभा ठरतात राजकीय आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST

गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यात सर्वच ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येतात. गावविकासाकरिता या ग्रामसभा महत्त्वाच्या असल्या तरी गावात वाढत असलेल्या आपसी राजकारणामुळे या ग्रामसभा राजकीय आखाडे बनतात.

ठळक मुद्देग्रामसेवक युनियनचे मुख्यकार्यपालन अघिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यात सर्वच ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येतात. गावविकासाकरिता या ग्रामसभा महत्त्वाच्या असल्या तरी गावात वाढत असलेल्या आपसी राजकारणामुळे या ग्रामसभा राजकीय आखाडे बनतात. राष्ट्रीय सण म्हणून ओळख असलेल्या या दिवसात गावाच्या विकासाकरिता झटणाऱ्या शासनाच्या कर्मचाऱ्यांवर विनाकारण मानहाणी होण्याची नामुष्की ओढवत असल्याने या दिवसाला होणाºया सभा रद्द कराव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसवेक युनियनन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाºयांना केली आहे.याच वेळी ग्रामपंचायतीच्या कामाव्यतिरिक्त इतर कामाच्या ताण वाढल्याने कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती खालावत आहे. राज्यात गत दोन वर्षांत अनेक ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्या आहेत. शेकडो ग्रामसेवकांचे अपघात झाले आहेत. यामुळे ग्रामसेवकांवर टाकण्यात आलेल्या अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्याच्या मागणीकरिता बुधवारी संपुर्ण राज्यात मुकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. वर्धेतही असा मोर्चा आयोजित करण्यात येणार असून या मोर्चात जिल्ह्यातील ग्रामसवेक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर धडकणार असल्याचे संघटनेने कळविले आहे.वर्धेलगतची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीअंतर्गत कारला येथे २६ जानेवारी २०१६ रोजी एका नागरिकाने ग्रामसचिवाच्या अंगावर रॉकेल फेकत स्वत:ही जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.