शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
4
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
5
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
6
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
7
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
8
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
9
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
10
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
11
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
12
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
13
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
14
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
15
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
16
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
17
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
19
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
20
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार

१ लाख १७ हजार बालकांना पोलिओ लस

By admin | Updated: February 22, 2016 02:19 IST

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्या हस्ते सामान्य रुग्णालयात करण्यात आला.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरूवर्धा : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्या हस्ते सामान्य रुग्णालयात करण्यात आला. पोलिओ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात १३३७ ग्रामीण व १९९ शहरी केंद्रामार्फत १ लाख १७ हजार ७७६ बालकांना लस पाजण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस मिळण्याकरिता सर्वांनी परिश्रम घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. मडावी यांनी केले. लसीकरण मोहिमेत ३ हजार २४७ कर्मचारी व २६७ पर्यवेक्षक कार्यरत आहे. यावर्षी ग्रामीण भागातील ८६ हजार १३४ तर शहरी भागातील ३१ हजार ६४२ बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार आहे. शिवाय टोल नाके, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी ८० ट्रान्झीट टिम्स लावण्यात आल्या आहेत. ९३ मोबाईल टिम्सद्वारे विटभट्ट्या, ऊसतोड कामगार आदी भटक्या कुटुंबातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अस्थिरोग तज्ञ डॉ. हिवलेकर, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. नितीन निमोदीया, डॉ. संजय गाठे, डॉ. पारेकर, डॉ. धाकटे उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)१९,६०८ बालकांना पोलिओ लसदेवळी : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ खा. रामदास तडस यांचे हस्ते बालकांना पोलिओची लस देऊन करण्यात आला. स्थानिक ग्रामीण रूग्णालयात आयोजित कार्यक्रमाला नगराध्यक्ष शोभा तडस, जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील ५ आरोग्य केंद्रात १९ हजार ६०० बालकांना ड्राप देण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.देवळी येथील आरोग्य केंद्रात ३ हजार, ५७ गौळ येथील प्राथमिक आरोग्य २ हजार ३२, गिरोली येथील केंद्रात १ हजार ४४५, विजयगोपाल येथे १ हजार २८४ तसेच नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २ हजार ६५९ लाभार्थी बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे.यानुसार तालुक्यात १३३ बुथ लावून मोहिम राबविण्यात आली. या व्यतिरिक्त विजयगोपाल येथे १ हजार २८४ तसेच नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २ हजार ६४९ बालकांना या मोहिमेचे लक्ष ठरविण्यात आले. या व्यतिरिक्त ११ फिरते पथकाचे माध्यमातून भटकी वसाहत, पारधी बेडा, औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहत, ऊसतोडणी टोळी तसेच नहराचे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना लस देण्यात आली. या कार्याकरिता तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य अधिकारी वर्ग, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. बालकांना पोलिओची लस देऊन या आजारापासून बचाव करण्यासाठी एकप्रकारे कवचकुंडले प्रदान केले, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)