शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

महिलांच्या तक्रारीनंतर आली पोलिसांना जाग

By admin | Updated: June 14, 2017 00:52 IST

वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत जांगापूर शिवारात राष्ट्रीय महामार्गावर ठेला लावून दारूविक्रीचा व्यवसाय चालत होता.

राष्ट्रीय महामार्गावरील ठेला हटविला : दारूविक्रीचा होता ग्रामस्थांना त्रास लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत जांगापूर शिवारात राष्ट्रीय महामार्गावर ठेला लावून दारूविक्रीचा व्यवसाय चालत होता. याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत होतो. यामुळे संतप्त महिलांनी पोलीस ठाणे गाठत तात्काळ कारवाईची मागणी केली. यावरून ठाणेदार गजानन वासेकर यांनी कर्मचारी पाठवून सदर ठेला हटविला. जांगापूर येथील महिलांनी एकत्र येत दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील टपरीवर दारूविक्रीचा व्यवसाय चालत होता. सदर चहाटपरी बाबुसिंग जुनी याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात येत होते. दारूविक्रीच्या व्यवसायाचा गावातील महिलांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिणामी, महिलांनी एकत्र येत मंगळवारी वडनेर पोलीस ठाणे गाठत ठाणेदार वासेकर यांना त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. महिलांच्या तक्रारीवरून ठाणेदार वासेकर यांनी लगेच पोलीस कर्मचारी पाठवून महिलांसमक्ष ठेला हटविला. निवेदन देताना अरुणा राऊत, करुणा पोहणकर, संगीता वांढरे, कांचनबाला घोरपडे, संगीता मरस्कोल्हे आदी उपस्थित होत्या. राष्ट्रीय महामार्गावरील टपरीत दारूविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची तक्रार प्राप्त झाली. यावरून टपरी हटविली आहे. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेहमीच सहकार्य राहिल. नागरिकांनी काही अडचणी असल्यास तक्रारी कराव्यात. - गजानन वासेकर, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वडनेर.