शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅफकॉनच्या विरोधात तक्रार देणाऱ्याना पोलिसांची दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

अ‍ॅफकॉन्स कंपनीची मोठमोठी वाहने या परिसरातील रस्त्यावरून दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरील धुळ नजिकच्या शेतातील पिकांवर साचत असल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके खराब झाली आहेत. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास ते जुमानत नाही उलट कंपनीचे अधिकारी पोलीसांकरवी शेतकऱ्यांनाच हे सरकारी काम आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : वाहनांच्या धुळीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : सोरटा-विरूळ भागात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. अ‍ॅफकॉन्स कंपनीची मोठमोठी वाहने या परिसरातील रस्त्यावरून दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरील धुळ नजिकच्या शेतातील पिकांवर साचत असल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके खराब झाली आहेत. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास ते जुमानत नाही उलट कंपनीचे अधिकारी पोलीसांकरवी शेतकऱ्यांनाच हे सरकारी काम आहे. याला विरोध तर खबरदार अशी दमदाटी करतात. विरूळ परिसरातून या कामासाठी लागणारा मुरूम व इतर साहित्य गोळा करण्यासाठी अ‍ॅफकॉन्स कंपनीची मोठ-मोठी जड वाहणे परिसरातील विरूळ, सोरटा, रसुलाबाद, पिंपळगाव, निजामपूर, टाकळी, मारडा , सालफळ या गाव परिसरातील रस्त्यावरून दिवसरात्र फिरत असतात. या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांची तर वाट लागलीच पण रस्ता लगतची अनेक शेतकऱ्यांची उभ्या पिकांवर धुळीचे कण साचून पिके कोमजली व पिकांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया थांबुन पिके खराब झाली. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यंदा निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतमाल उत्पन्नात घट आली असून त्या संकटात अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या मनमानी कारभाराने शेतकºयांच्या नुकसानीत भर टाकली आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांवर दिवसाला दोन वेळा पाणी मारून उडणारी धुळ कमी करण्याची विनंती केली असता ते याकडे दुर्लक्ष करतात. यापूर्वी सुध्दा या भागात कंपनीच्यावतीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अवैध उत्खन्न करण्यात आले त्यांच्या संदर्भात पोलिसात तक्रारी दिल्या पण पोलिसांनी कारवाई केली नाही.सरकारी कामात अडथळा आणू नकाशेतकऱ्यांनी याबाबत कंपनीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली असता पोलीस देखील कंपनीचीच बाजू घेवून हे सरकारी काम काम आहे. यात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करू अशी शेतकऱ्यांनाच दमदाटी करतात. कंपनीचे अधिकारी व पोलीसांच्या दमदाटीला शेतकरी कंटाळले असून माजी जि.प.सदस्य गजानन निकम यांच्या नेतृत्वात कंपनीविरूध्द लढा दिला जाणार आहे, अशी माहिती शेतकºयांनी दिली.