शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत ऐनवेळी पोलीस पाटलांच्या मुलाखती रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:14 IST

जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देउमेदवारांची ताटकळ : हिंगणघाटात पुढची तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र वर्धेत ऐन वेळेवर मुलाखती रद्द करण्यात आल्याने चांगलाच गोंधळ माजला. तर हिंगणघाट येथेही मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या.वर्धेत होणाऱ्या मुलाखती पारदर्शक व्हाव्या, यात कुण्या दलालाचा हस्तक्षेप होवू नये असे म्हणत या मुलाखती वेळेवर रद्द करण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. तर हिंगणघाट उपविभागात आजंती येथील पोटनिवडणूक असल्याने मुलाखती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐन वेळेवर मुलाखती रद्दचा निर्णय घेण्यात आल्याने मुलाखतीला आलेल्या उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली. वर्धा आणि हिंगणघाट उपविभागात या मुलाखती आता ९ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.निर्धारित वेळेनुसार आज वर्धा उपविभागात मुलाखत असल्याने वर्धा विभागातील १७५ विद्यार्थी सकाळीच हजर झाले. वर्धेत एकूण १९० जागा असून याकरिता ७७७ उमेदवार पात्र ठरले आहे. त्यांच्या मुलाखती आजपासून होणार होत्या. मात्र उपविभागीय कार्यालयातील आदेश पाहताच उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अनेक महिला तर आपल्या चिमुकल्यांना घेऊन रखरखत्या उन्हात आल्या होत्या. ऐन वेळेवर मुलाखत रद्द झाल्याचे कळताच त्यांची चांगलीच निराशा झाली आणि त्यांना परत जावे लागले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ पाहायला मिळाला.याबाबत उपविभागीय अधिकारी यांना विचारले असता त्यांनी पारदर्शक प्रक्रिया पार पडावी व कोणताच राजकीय हस्तक्षेप होऊ नये या दृष्टीने मुलाखती पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगितले. सोबतच एमपीएससी पॅटर्ननुसार मुलाखत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.वर्धेत होणार टोकन पद्धतीतून मुलाखतीवर्धेत येत्या ९ तारखेला होणाऱ्या मुलाखती टोकन पद्धतीने होणार आहे. यात मुलाखत घेणाºयाला उमेदवाराचे नाव माहीत राहणार नाही. यामुळे घोळ होण्याची शक्यता राहणार नाही. घेतलेला निर्णय पारदर्शक पद्धतीने मुलाखती होण्याकरिता योग्य असला तरी वेळेवर प्रक्रिया रद्द झाल्याने उमेदवारांची झाली. उमेदवारांना याची पूर्वसूचना दिली असती तर हा प्रकार घडला नसता. यामुळे मुलाखतीकरिता आलेल्यांची तारांबळ उडाली.आर्वीत झाल्या मुलाखतीशासनाच्या कार्यक्रमानुसार ६ एप्रिलपासून मुलाखती होणार होत्या. त्यानुसार आज आर्वी येथे मुलाखती पार पडल्या. येथे १३० जागांकरिता मुलाखती होत आहे. यात ५४७ उमेदवारांच्या मुलाखती होत आहे. आज पहिल्या दिवशी ९४ उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू होती.