शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा

By admin | Updated: June 28, 2015 02:36 IST

मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्यांच्या जीवनातला आनंद हिरावता येत नाही.

विनयभंग प्रकरण : मुलींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपा- महिलांचे साकडेवर्धा : मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्यांच्या जीवनातला आनंद हिरावता येत नाही. बोरधरण व इतर ठिकाणी मुलींना पोलिसांकडूनच त्रास दिला जात असल्याचे प्रकरण उजेडात येत आहे. तेव्हा खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांना आरोपींना संरक्षण न देता सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी शनिवारी सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्यावतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात युवक-युवती फिरावयास गेले असता तेथे गस्तीवरील पोलिसांकडून एकटीला आड नेऊन तुझे मेडीकल करतो म्हणून अश्लील चाळे करणे, विनयभंग, बलात्कार करणे हे प्रकार सुरू आहे. तिच्या मित्राच्या वाहनाचा प्लग काढून घेणे, मोबाईल घेणे, दहशतीने कायद्याचा खोटा वापर करुन गप्प बसविणे, शारीरिक, मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहे. बदनामीपोटी ही युवा मंडळीही हा अत्याचार निमुटपणे सहन करतात. याचाच फायदा वासनांध अधिकारी घेत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून केला आहे. याला बळी पडलेल्या मुलींमध्ये कमालीची दहशत आहे, असे नमूद करुन या कृत्याचा निषेधही नोंदविला आहे. शिष्टमंडळात प्रा. नूतन माळवी, शारदा थुटे, सविता घोडे, प्रतिभा भुजाडे, पुष्पा जीवने, कल्पना कापुरे, चेतना सवाई, मीरा इंगोले, सुचिता इंगोले, तायडे, जिजा बोरकर, शालिनी पाटील, सुनीता शंभरकर, सुनील सावध, किशोर बकाले, सिंधु वागहे, सुमन तिरपुडे, नंदकुमार वानखेडे उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)आरोपींवर कठोर कारवाई करा-रामदास तडसबोरधरण येथील विनयभंग प्रकरणी तपासात दोषी आढळलेले उपनिरीक्षक राजू चौधरी व त्याला मदत करणारा वाहन चालक नीलेश मेश्राम यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असे निर्देश खा. रामदास तडस यांनी पोलीस अधीक्षकांना एका पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस खात्याच्या कामकाजाविषयी चुकीचा संदेश जात आहे. तसेच जनतेत पोलीस विभागाविषयी अविश्वासाची भावना वाढत आहे. ही बाब पोलीस खात्याच्या बदनामीचे कारण ठरत आहे. याआधीसुद्धा असे प्रकार या दोघांनी केले आहेत. त्याचीसुद्धा चौकशी व्हावी, असेही पत्रात नमूद आहे. यासोबतच सदर प्रकरणातील तपासाच्या प्रगतीविषयी कळवावे, जेणेकरुन शासनाची (पोलीस विभागाची) बाजू समाधानकारक मांडू शकेल, असेही पत्रात शेवटी अधोरेखित केले आहे.