शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चालानमध्येही पोलिसांची मांडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:49 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे.

ठळक मुद्देपावतीतून दंडाची रक्कम बेपत्ता : ५०० सांगत १०० रुपयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. या उपाययोजनांना त्यांचेच कर्मचारी हरताळ फासत असल्याचे दिसते. वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाºयांना चालान देतानाही त्यांच्याकडून मांडवलीची भाषा बोलली जात आहे. यात आपला खिसा भरावा याकरिता न्यायालयात सादर करण्यात येणाºया चालानवर या कर्मचाºयांकडून दंडाची रक्कमही लिहिली जात नसल्याचा प्रकार वर्धेत घडला आहे.शहरातील दोन रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. याची माहिती नसणारा एक विद्यार्थी या रस्त्याने गेला. येथे नियमांचे उल्लंघण होताच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडून त्याला अडवून दंड देण्याबाबात प्रक्रीया सुरू झाली. येथे विद्यार्थ्याकडे रक्कम नसल्याने त्याने पैसे नसल्याचा पाढा वाचला. यावेळी उपस्थित वाहतूक पोलिसाने त्याला पहिले ५०० रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. आपल्याकडे सध्या काही रक्कम नाही, असे म्हणताच सदर कर्मचारी ३०० रुपये म्हणत २०० रुपये भरा, असे म्हणू लागला. यावरही त्या विद्यार्थ्याने आपल्याकडे काहीच रक्कम नाही, चालन द्या मी कार्यालयात येवून दंड भरतो, असे म्हटले.यावर सदर कर्मचाºयाने त्या विद्यार्थ्याच्या हाती चालान दिले. तर अनामत म्हणून त्याचा वाहन चालविणाºयाचा परवाना जप्त केला. या विद्यार्थ्याने घरी आल्यावर त्या चालानची तपासणी केली असता त्यात दंडाच्या रकमेचा उल्लेखच नसल्याचे समोर आले. यामुळे सदर युवक अवाक् झाला.वाहतूक पोलिसांकडून शहरात सुरू असलेल्या खुलेआम लुटीची चर्चा सर्वत्र असताना समोर आलेला हा प्रकार त्याला दुजोरा देणाराच ठरला आहे. या पोलिसांकडून होत असलेली वसुली कधी आड मार्गाने होत होती, तर आता कायद्याने दिलेल्या चालानच्या माध्यमातूनच हा प्रकार सुरू झाल्याचे वर्धेत दिसत आहे. चालकाकडून ५०० रुपये घ्यायचे आणि शासनाच्या तिजोरीत २०० रुपये भरायचे, असा प्रकार यातून होत असल्याचा संशय बळावत आहे.कायद्यानुसार दंडाचा उल्लेख अनिवार्यवाहतूक नियमांचे उल्लंघण करणाºयांना वाहतूक पोलीस कर्मचाºयांकडून चालान देण्यात येते. या चालानावर तोडलेल्या नियमाचा आणि त्याच्या दंडाचा स्पष्ट उल्लेख असणे कायद्याने बंधनकारक आहे. येथे मात्र तसे झाले नाही. चालानवर कारणाचा उल्लेख आहे; मात्र दंडाचा कुठलाही उल्लेख नाही. यामुळे वाहतूक पोलिसांकडून दररोज होत असलेल्या कारवाईवर संशय निर्माण होत आहे.